Madhubala Sister News 
मनोरंजन

मधुबालाच्या बहिणीला सुनेनं काढलं घराबाहेर, दोन दिवस उपाशी!

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News: ज्या अभिनेत्रीच्या (Bollywood Actress) सौंदर्याचे अजूनही गोडवे गायले जातात. चर्चा होत असते. तिच्या अभिनयावर चाहते तासन् तास बोलत राहतात त्या सौंदर्यवती मधुबालाच्या (Madhubala) नावाची जादू काही औरच म्हणावी लागेल. 70 च्या दशकांत मधुबाला (Entertainment News) यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना आपलेसे केले. त्यांचं दिसणं, पडद्यावर वावरणं हे सगळं जादुई होतं. असं चाहते सांगतात. मुघले आझममधील त्यांचा डान्स, आणि अभिनय यामुळे मधुबाला यांच्यावर नेहमीच चर्चा होते. मात्र या दिवंगत अभिनेत्रीच्या बहिणीच्या वाट्याला सध्या उपेक्षा येत असल्याचे दिसून आले आहे. आपण त्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. Madhubala Sister kanij balsara 96 yeras old out of house by daughter in law

मधुबाला यांची मोठी बहिण कनीज बलसारा (Kanij Balsara) या सध्या 96 वर्षांच्या आहेत. त्यांना त्यांच्या सुनेनं घराबाहेर काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवढचं नाहीतर त्यांना जबरदस्तीनं ऑकलंडवरुन मुंबईला पाठवून दिले. तसेच मुंबईमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलीला परवीनला याबाबत कोणतीही माहिती दिली गेली नाही. त्याचं झालं असं की, 29 जानेवारीला कनीज बलसारा यांच्या सुनेनं त्यांना ऑकलंडवरुन मुंबईला येणाऱ्या फ्लाईटमध्ये बसवून दिलं. मात्र त्यावेळी त्यांच्याकडे ना पैसे होते ना कुठलं सामान. त्याविना त्या मुंबईत आल्या.

जेव्हा कनीज या मुंबईत आल्या तेव्हा एअरपोर्ट ऑथरिटीनं त्यांची चौकशी केली. आणि त्यांच्या मुलीला फोन करुन विमानतळावर बोलावून घेतले. याबाबत इ टाईम्सनं सविस्तर वृत्त दिलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कनीज यांनी आपल्या मुलीला जे सांगितलं ते सर्व धक्कादायक होतं. परवीज यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की, साधारण 17 ते 18 वर्षांपूर्वी त्या आपला मुलगा फारुखकडे गेल्या. त्यांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. त्यामुळे त्या त्याच्यासोबत गेल्या होत्या. मात्र कालांतरानं पुढे परिस्थिती बदलली. त्याचा फटका कनीज यांना बसल्याचे दिसून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महामंडळाचा प्रसाद फक्त शिंदे गटाला? हेमंत पाटलांसह संजय शिरसाटांवर नवी जबाबदारी; नाराज आमदारांचे राजकीय पुनर्वसन

Kush Maini: धक्कादायक! भारताचा फॉर्म्युला-2 रेसर अपघातादरम्यान थोडक्यात बचावला, दुर्घटनेदरम्यानचा Video आला समोर

Manchar News : पुणे-नाशिक औद्योगिक राष्ट्रीय महामार्ग होणार रद्द; सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

Uruli Kanchan Crime : उरुळी कांचन गोळीबार प्रकरण बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळेंसह पाच‌ जणांना पोलिस कोठडी

Noise Pollution : ध्वनी प्रदूषण नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर करण्यात येणार कारवाई; पोलिस आयुक्त अमितेश कुमार

SCROLL FOR NEXT