Madhurani Prabhulkar  Instagram
मनोरंजन

Madhurani Prabhulkar: ह्या उष्णतेच्या काळात स्वतःला असं कूल ठेवते मधुराणी.. म्हणाली, 'हेच आहेत माझे Life Savers..'

मधुराणी प्रभुलकरनं सोशल मीडियावर पोस्ट करत लोकांना उष्णतेच्या चटक्यांवर उत्तम उपाय सांगितलेला आहे..अनुभवून बघायला हरकत नाही.

प्रणाली मोरे

Madhurani Prabhulkar 'आई कुठे काय करते' मालिकेमुळे घराघरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिनं पोस्ट केली आणि लोकांनी ती उचलून धरली नाही असं होणं अशक्य. मधुराणी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

ती अनेक मालिकेच्या सेटवरील गमती-जमती देखील शेअर करते. मधुराणीचं हे एक मात्र खूप भारी आहे की ती अनेकदा तिच्या चाहत्यांच्या उपयोगाच्या अशा अनेक पोस्ट शेअर करते. नुकतीच तिनं एक पोस्ट केली आहे ज्यात तिनं उन्हाळ्यात स्वतःला कूल ठेवण्यासाठी ती काय करते याचं उत्तम उदाहरण चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

चला..जाणून घेऊया नेमकं काय म्हणालीय मधुराणी तिच्या पोस्टमधून ते.(Madhurani Prabhulkar Latest Post summer post actress cool solution on sun heat)

मधुराणी प्रभुलकरनं तिचा सेटवरचा एक सुंदर शुटिंग दरम्यानचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की,''ह्या उष्णतेच्या काळात स्वतः ला cool ठेवण्यासाठी नैसर्गिक अत्तरं ही माझी ' life savers'. त्यात मोगरा आणि वाळा माझे अतिशय लाडके...
माझी ही सुगंधाची आवड माझ्या असिस्टंट रियासत ला चांगलीच माहिते. तो नेहमी देशमुखांच्या बागेतून माझ्यासाठी गुलाबाची , प्राजक्ताची फुलं आणून देत असतो..''

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मधुराणीनं स्वतःला उन्हाळ्यात कूल ठेवण्यासाठी सांगितलेला हा फुलांच्या सुंगधाचा पर्याय खूपच स्वस्त आणि मस्त आहे. अर्थात तिच्या या पोस्टवर लोकांनी देखील भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

एकानं तर चक्क लिहिलं आहे,''तुझी सिझनल फुलांची आवड छानच आहे पण मला तुला पाहुनच खुप शांत, अन थंड वाटतं , ते शांत , निरागस भाव अन सावकाश होणारी लयबध्द हालचाल सुखावुन जाते अशीच आनंदी रहा मधुराणी अन देखणी तर तु आहेसच..''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT