Mansi Sharma Blessed With Baby Girl: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'महाभारत'मध्ये अंबालिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी शर्मा हिने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मानसी शर्मा दुसऱ्यांदा आई झाली आहे.
या वर्षी मे महिन्यात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली होती. आता तिच्या घरी एका छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
मानसीने हंसराज हंस यांचा मुलगा युवराज हंसशी लग्न केले आहे. या जोडप्याला आधीच एक मुलगा आहे ज्याचे नाव हदय आहे. मानसीने 23 जुलै 2023 रोजी, ग्रँड बेबी शॉवरचे आयोजन केले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मानसी आणि युवराज हंसने यांनी 21 फेब्रुवारी 2019 रोजी लग्न केले.
युवराज आणि मानसी 'बॉक्स क्रिकेट लीग' दरम्यान एकमेकांना भेटले होते. आधी दोघांनी बऱ्याच दिवसानंतर डेट केल्यानंतर लग्न केले.
मानसीने 'देवों के देव महादेव', 'पवित्र रिश्ता', 'महाभारत', 'चंद्र नंदिनी', 'उत्तरन' या अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. 'मरियम खान - रिपोर्टिंग लाइव्ह' आणि 'विक्रम वेताल की रहस्य गाथा' मध्ये दिसली होती.
तर युवराज हंसने 'यार अन्नमूल', 'मिस्टर अँड मिसेस 420', 'प्रॉपर पटोला', 'लाहोरिया' यांसारख्या अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मानसी शर्माचे यूट्यूबवर एक चॅनलही आहे. तिचे यावर 60 हजारांहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत आहेत तर इंस्टाग्रामवर त्याचे 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती तिच्या पती आणि मुलासोबत रील आणि फोटो पोस्ट करते. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. आता तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.