Mahabharat Dhritrashtra Then And Now esakal
मनोरंजन

Mahabharata : महाभारतातल्या धृतराष्ट्राला 'एअरफोर्स'मध्ये जायचं होतं, पण..., आता कुठयं 'तो' अभिनेता?

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध मालिका म्हणून ज्याचे नाव घेतले जाते त्या महाभारत आणि रामायण मालिकेनं प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळवली होती.

युगंधर ताजणे

Mahabharat Dhritrashtra Then And Now : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध मालिका म्हणून ज्याचे नाव घेतले जाते त्या महाभारत आणि रामायण मालिकेनं प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळवली होती. त्या मालिकेत काम करणाऱ्या कलावंतांची क्रेझ अद्यापही प्रेक्षकांच्या मनात कायम असल्याचे दिसून आले आहे.

बीआर चोप्रा यांची प्रसिद्ध टीव्ही सीरियल महाभारत नावाची मालिका ही प्रचंड गाजली होती. त्याचे सर्वस्तरातून स्वागत झाले होते. एकीकडे रामायण मालिका यशाच्या शिखरावर असताना दुसरीकडे महाभारत मालिकेनं देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. या मालिकेत धृतराष्ट्र यांची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते गिरीजा शंकर हे आता चर्चेत आले आहे.

गिरीजा शंकर यांनी पार पाडलेली भूमिका प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय (Mahabharat Dhritrashtra) होती. तब्बल ३६ वर्षानंतरही ज्यांनी पुन्हा महाभारत पाहण्याचा आनंद घेतला आहे ते त्यांचे फॅन्स झाले आहेत. एका मुलाखतीध्ये गिरीजा शंकर हे काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत. बीआर चोप्रा यांची प्रसिद्ध टीव्ही सीरियल महाभारत यांच्याविषयी सांगायचे झाल्यास त्या मालिकेचे नाव आता इतिहासात दाखल झाले आहे.

१९८८ मध्ये पहिल्यांदा महाभारत या मालिकेचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला होता. त्यानंतर अजुनही ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्या मालिकेतील अनेक पात्रं ही प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय आहे. गिरीजा शंकर हे सध्या हॉलीवूडमध्ये आपल्या नावाची मोहोर उमटवताना दिसत आहे. ते आता भारत सोडून विदेशात स्थायिक झाले आहेत. पंजाबमधील गिरिजा यांचे बालपण पटियालामध्ये गेले.

गिरिजा यांना लहानपणापासून वैमानिक व्हायची खूप इच्छा होती. त्यांनी एअरफोर्सची एक परिक्षा दिली होती. मात्र त्यात ते अयशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी अॅक्टिंग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी महाभारत या मालिकेपासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यात त्यांनी धृतराष्ट्रची भूमिका साकारली होती.

गिरिजा यांना जेव्हा कळलं की, त्यांना धृतराष्ट्राची भूमिका करायची आहे तेव्हा त्यांनी नकार दिला होता.त्यांना त्याविषयी काहीही माहिती नव्हतं. एका अंध व्यक्तीची भूमिका करणं हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. मात्र ते आव्हान अखेर गिरिजा यांनी पूर्ण करुन दाखवलं. आता गिरिजा हे सध्या हॉलीवूडमधील वेगवेगळ्या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय पक्ष मेले तरी... निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, शरद पवारांवरही घणाघात

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Maratha Reservation: सरकार नालायक, तरुण जीव संपवतायेत; मनोज जरांगेंचा संताप....!

Milind Soman runs barefoot: मिलिंद सोमण नुकतेच धुक्यात अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण खरंच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.

IPL 2025: मुंबईचा कोच आता RCB मध्ये सामील; 18 व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT