Mahabharat Movie News esakal
मनोरंजन

Mahabharat: सातशे कोटींचा 'महाभारत', बॉलीवूड अभिनेत्यांची 'खोगीरभरती!'

ऐतिहासिक, पौराणिक कथांना नव्या रुपात सादर करण्याचा ट्रेंड हा काही वर्षात लोकप्रिय झाला आहे. विशेषत टॉलीवूडनं या ट्रेंडमध्ये बक्कळ पैसा कमवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Movie News: ऐतिहासिक, पौराणिक कथांना नव्या रुपात सादर करण्याचा ट्रेंड हा काही वर्षात लोकप्रिय झाला आहे. विशेषत टॉलीवूडनं या ट्रेंडमध्ये बक्कळ पैसा कमवला आहे. ते चित्रपट मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय देखील झाले (Tollywood Vs Bollywood) आहेत. त्यात बाहुबलीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. या चित्रपटाचे दोन्ही पार्ट कमालीचे लोकप्रिय झाले. हजार कोटींपर्यत दोन्ही चित्रपटांनी कमाई केली होती. आरआरआर हा देखील एका ऐतिहासिक (RRR Movie) घटनेवर आधारित चित्रपट त्यानं देखील प्रेक्षकांना जिंकून घेत पाचशेहून अधिक कोटींची कमाई केली. आता बॉलीवूडचे काही निर्माते एकत्रितपणे महाभारतावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

बऱ्याच वर्षांपासून महाभारतावर आधारित एका कलाकृतीची निर्मिती करायची अशी चर्चा होती. अमेरिकेत चालणाऱ्या डी 23 एक्सपोमध्ये महाभारतावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचे काही प्रोमोही व्हायरल झाले होते. कौरव आणि पांडवांची गोष्ट महाभारताद्वारे मांडण्याचे शिवधनुष्य आता बॉलीवूडनं पेललं आहे. येत्या काळात ते यशस्वी होणार की प्रेक्षकांची निराशा होणार हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

दिग्दर्शक फिरोज नादियावाला या विषयावर चित्रपट निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी महाभारताचे शिवधनुष्य पेलेलं आहे. या चित्रपटामध्ये बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी दिसणार आहेत. 700 कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटानं बॉलीवूडला बऱ्याच दिवसांपासून आलेली मरगळ दूर केली आहे. अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरु झाली आहे. 90 च्या दशकांत बी आर चोप्रा यांनी महाभारत ही मालिका टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणली होती. त्याला प्रेक्षकांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.

कोरोनाच्या काळात महाभारत मालिकेचे एपिसोड रिटेलिकास्ट करण्यात आले होते. त्यालाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. फिरोज नाडियावाला यांनी यापूर्वी हेरा फेरी, वेलकम सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. मीडिया रिपोर्टसकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजुन या चित्रपटाच्या प्री प्रॉडक्शनचे काम सुरु असून तो 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुळ चित्रपट हा हिंदीमध्ये प्रदर्शित होणार असून इतर पाच भाषांमध्ये देखील तो रिलिज केला जाणार आहे.

या चित्रपटाबदद्ल फिरोज यांनी सांगितले होते की, हॉलीवूडचे लॉर्ड ऑफ द रिंग्स, गेम ऑफ थ्रोन्स हॅरी पॉटर सारखे जे चित्रपट आहेत त्याच धर्तीवर या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. तीन तासांच्या या चित्रपटामध्ये असं म्हटलं जातंय की, नाना पाटेकर, परेश रावल, अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, अनिल कपूर हे अभिनेते काम कऱणार असल्याची माहिती आहे. याशिवाय आणखी दिग्गज सेलिब्रेटीही त्यात सहभागी होणार आहेत. याशिवाय साऊथचे काही सेलिब्रेटी देखील त्यात काम कऱणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: सांगोला मतदार केंद्राबाहेर शेकाप - ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले

Voting Percentage: दुपारी १ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर; महाराष्ट्र की झारखंड, मतदानात कोण ठरला मोठा भाऊ?

Assembly Election Voting 2024: ऐन मतदानाच्या दिवशी महाविकास आघाडीत फूट, उद्धव ठाकरेंना टेन्शन...काँग्रेसने भूमिका बदलली?

ICC T20I Ranking : हार्दिक पांड्या अव्वल; तिलक वर्माने कॅप्टन सूर्यासह ६८ फलंदाजांना एका झटक्यात मागे टाकले

Traffic Update: पुणे सातारा महामार्गावर अदभुतपुर्व वाहतुक कोंडी; 12 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT