Ranbir Kapoor ED Notice: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरला ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणी ED ने 6 ऑक्टोबर रोजी समन्स बजावले आहे.
महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकार आणि गायक ED च्या एजन्सीच्या रडारवर आहेत. ED ने UAE मधील अॅपच्या प्रवर्तकाच्या लग्न आणि सक्सेस पार्टीला जे उपस्थित होत्या त्या सगळ्यांची चौकशी सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रणबीर कपूर या गेमिंग अॅपचं प्रमोशन करत होता. या अॅपच्या माध्यमातून रणबीर कपूरने मोठी रक्कम कमावली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
त्यामुळे रणबीरला ED ने समन्स बजावलं आहे. ६ ऑक्टोबरला रणबीरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश आहे. त्यामुळे रणबीरच्या अडचणीत वाढ झालीय.
महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात तपास एजन्सी बॉलिवूडमधील इतर काही प्रमुख कलाकार आणि गायकांना समन्स बजावण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात, इंडिया टुडेच्या एका विशेष अहवालात या वर्षी फेब्रुवारीमध्ये UAE मध्ये महादेव बुक अॅप प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांच्या लग्न समारंभात सहभागी झालेले अभिनेते आणि गायक उघड झाले.
यामध्ये टायगर श्रॉफ, सनी लिओन, नेहा कक्कर, आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, एली अवराम, भारती सिंग, भाग्यश्री, क्रिती खरबंदा, नुश्रत भरुच्चा, कृष्णा अभिषेक आणि सुखविंदर सिंग यांचा समावेश होता. आता रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ झालीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.