Ritesh Deshmukh sakal
मनोरंजन

Ritesh Deshmukh : महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन रितेश

अभिनेता रितेश देशमुख हे मराठमोळं नाव बॉलीवूडमध्ये तर गाजत आहेच. शिवाय या नावाने गेल्या वर्षभरात मराठी सिनेसृष्टीत वलय निर्माण केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

अभिनेता रितेश देशमुख हे मराठमोळं नाव बॉलीवूडमध्ये तर गाजत आहेच. शिवाय या नावाने गेल्या वर्षभरात मराठी सिनेसृष्टीत वलय निर्माण केले आहे. मराठी सिनेसृष्टीतल्या आपल्या पदार्पणातच रितेशच्या ‘लय भारी’ सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि गेल्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

आवडता अभिनेता, उत्तम दिग्दर्शक यासह आता रितेश देशमुख ‘महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन’सुद्धा ठरला आहे. झी टॉकीज या वाहिनीच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३’ या पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर ‘महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन’ पुरस्कार रितेश देशमुख यांनी पटकावला आहे.

विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षीही स्टाईल आयकॉन बनवण्याचा मान त्याला मिळाला आहे. यंदा या पुरस्काराच्या स्पर्धेत अभिनेता अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि ललित प्रभाकर यांची नावे होती. मात्र, प्रेक्षकांनी रितेश देशमुखला भरघोस मते देत पसंतीचा कौल दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश! इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; ‘या’ ८ मतदारसंघातील आहेत कर्मचारी

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

SCROLL FOR NEXT