Maharashtra Shahir Actress Sana Shinde Podcast  Esakal
मनोरंजन

Sana Shinde Exclusive: अंकुशला 'काका' म्हणणाऱ्या सनाने सांगितला त्याच्यासोबत रोमॅंटिक सीन करतानाचा 'तो' अनुभव..

'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातून सना शिंदे मराठी सिनेविश्वात पदार्पण करते आहे. या सिनेमाच्या निमित्तानं सनानं ईसकाळ सोबत मनमोकळा संवाद साधला आहे.

प्रणाली मोरे

Sana Shinde Exclusive: केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातनं सना शिंदे मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करतेय. सध्या या सिनेमातील तिच्यावर चित्रित झालेलं 'बहरला हा मधुमास नवा..' हे गाणं सोशल मीडियावर भलतंच ट्रेन्डिंगला आलं आहे.

सोशल मीडियावर या गाण्याच्या रील्सचा पाऊस पडतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रिटी देखील या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. सनाचा हा पहिलाच सिनेमा त्यातही थेट अंकुश चौधरीसोबत काम करण्याची संधी.

लहानणापासून ज्याला आपण 'काका' म्हणत आलो त्याच्यासोबत सिनेमात रोमॅंटिक सीन शेअर करताना सनानं स्वतःला कसं तयार केलं.. तसंच 'बहरला हा मधुमास..' या गाण्याच्या हूकस्टेपमागची इंट्रेस्टिंग स्टोरी अशा अनेक गोष्टी नवोदित अभिनेत्री सना शिंदेनं 'ईसकाळ'शी मनमोकळ्या गप्पा मारत शेअर केल्या आहेत.

बातमीत पॉडकास्ट मुलाखतीची लिंक जोडलेली आहे. तेव्हा सनानं साधलेला इंट्रेस्टिंग संवाद ऐकण्यासाठी नक्की ऐका ही पॉडकास्ट मुलाखत. (Maharashtra Shahir Actress Sana Shinde Podcast Kedar Shinde daughter)

महाराष्ट्र शाहीर सिनेमातील श्रेया घोषाल हिच्या आवाजातील आणि सना शिंदेवर चित्रित झालेल्या 'बहरला हा मधुमास नवा..' या गाण्यानं सध्या सोशल मीडियावर भलताच धुमाकूळ घातला आहे. याच गाण्याविषयी बोलताना सनानं याच्या मेकिंग मागचे अनेक किस्से शे्अर केले आहेत.

या गाण्याच्या सुरांवर अन् यातील हूकअप स्टेपवर सध्या सगळेच ताल धरतायत. पण ही स्टेप नेमकी आली कुठून अन् कशी यावर देखील सनानां या पॉडकास्ट मुलाखतीत खुलासा केला आहे. तेव्हा हे इंट्रेस्टिंग किस्से ऐकण्यासाठी सनाची पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

शाहिर साबळे ज्यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा. आणि सनाचे ते पणजोबा...आणि सिनेमात सना ज्या भानुमती साबळे यांची व्यक्तिरेखा साकारतेय त्या तिच्या पणजी.

त्यामुळे आपल्या पणजीसारखं दिसण्यासाठी...तिच्यासारखं चालण्या-बोलण्याची तयारी करताना कशी तयारी केली याचाअनुभही सनानं शेअर केला आहे. तसंच या भूमिकेसाठी जेव्हा पहिली लूक टेस्ट झाली तेव्हा काय होती सगळ्यांची रिअॅक्शन हा किस्सा तर भन्नाट आहे. तेव्हा सना शिंदेनं साधलेला मनमोकळा संवाद ऐकण्यासाठी नक्की ही पॉडकास्ट मुलाखत ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT