Maharashtrachi Hasya Jatra Fame Samir Choughule Shared Post For Sonali Kulkarni viral  Esakal
मनोरंजन

Samir Choughule: "शरीरात काळजाऐवजी नदीचे विशाल पात्र..." समीर चौगुलेंची अभिनेत्रीसाठी खास पोस्ट!

Vaishali Patil

Samir Choughule: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. हास्यजत्रेचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. या कार्यक्रमातील लोकप्रिय चेहरा म्हणजे समीर चौगुले. समीर केवळ अभिनेता नाही तर तो या कार्यक्रमात लेखक म्हणूनही जबाबदारी सांभाळतो. त्याची प्रत्येक भुमिका प्रेक्षकांना खुप हसवते.

मात्र समीर चौघुलेच्या एका पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्याने एका लोकप्रिय अभिनेत्रीसाठी खास पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये समीरनं तिच्या काही आठवणी सांगत तिचे आभार मानले आहे. इतकच नाही तर तिचे खुप कौतुकही केले आहे. ती अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

समीर चौघुलेंनी सोनाली कुलकर्णीसोबतचा एक फोटो शेयर करत एक लांबलचक पोस्ट शेयर केली आहे. खर तर सोनालीनं समीरला चार्ली चॅप्लिनची मुर्ती भेट दिली. त्याचा फोटो शेयर करत समीर त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहितो की, "कलाक्षेत्रात एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचे अत्यंत हृदयापासून खुल्या दिलाने कौतुक करणे ही गोष्ट तशी विरळच.. माझ्या 29 वर्षाच्या कारकिर्दीत मी सहकलाकारांनी माझ्यावर केलेले निस्सीम प्रेमही अनुभवले आणि ईर्षा, जेलसी, इनसिक्युरिटी हे प्रकारसुद्धा अगदी जवळून बघितले...अनुभवले..

आपल्याला इतरांच्या यशाचा जेवढा आनंद होतो तेवढा आनंद आपल्या यशाचा इतरांना होतो का? हा प्रश्न बरेचदा मला पडायचा...आपल्या जवळचे अनेक जण सोशल मीडियावर आपल्याबद्धल खूप वेगळे react होतात..पण प्रत्यक्षात मात्र त्यांचं खरं स्वरूप अत्यंत वेगळं असतं...पण शेवटी हे सगळ कलाक्षेत्राचा अविभाज्य भाग म्हणून मी ग्रेसफुली स्वीकारायला ही शिकलो..असे प्रकार कदाचित फक्त आमच्या कलाक्षेत्रापुरत मर्यादित नसावेत..या पार्श्वभूमीवर SonaliKulkarni सारखे कलाकार असतात. देवाने ज्यांच्या शरीरात काळजा ऐवजी नदीचे विशाल पात्र बसवलेले असते..

सोनाली या आमच्या हास्यजत्रेच्या कुटुंबातील प्रेमळ हास्यरसिक....आज माझ्या एका प्रहसनानंतर सोनाली कुलकर्णी यांनी माझ्या देवाची म्हणजेच "सर चार्ली चॅप्लिन" यांची एक अत्यंत सुंदर मूर्ती देऊन माझा गौरव केला..ही अत्यंत सुंदर मूर्ती पेणचे सुप्रसिद्ध मूर्तिकार देवधरसर यांनी घडवली आहे..(देवधरांनी घडवलेली ही चार्ली सरांची दुसरी मूर्ती माझ्या घरी आली..पहिली श्री.सुहास काळे वपु काळे यांचे सुपुत्र यांनी दिलेली स्नेहभेट होती) सोनाली यांना ही मूर्ती पेण येथील स्नेही श्री विनायक गोखले यांनी भेट दिली होती.. पण सोनाली मला म्हणाली " समीर, ज्या क्षणी ही मूर्ती माझ्या हातात आली त्या क्षणी मला तुझी आठवण आली...बरेच दिवस या मूर्तीचे वजन मला पेलवता येत नव्हते...

आज ती योग्य हातात देताना मला खूप आनंद होतोय"...ही तिची वाक्य माझ्यासाठी मोठा आनंदाचा सोहळा होता..देवाने स्वर्गातून पृथ्वीवर शिंपडलेल्या पंचामृताचा थेंब होता.. सोनाली कुलकर्णी सर्वोत्तम अभिनेत्री आहेत हे सर्वांनाच माहिती आहे..पण त्यांचे हे gesture या कलाक्षेत्रातील त्यांचे माणूसपण आणि वेगळेपण ठळकपणे दर्शवत... SonaliKulkarni तुझे खूप खूप आभार...मनापासून आभार सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर.....thank you Sony मराठी .....विशेष म्हणजे हा भाग जेव्हा चित्रित झाला ...त्या दिवशी बाप्पाच्या आगमनाचा दिवस होता..माझा बाप्पा साश्रू नयनांनी माझ्या घरी आला.....कायमचा...."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT