maharashtrachi hasyajatra fame vanita kharat shared post for boyfriend sumit londhe
maharashtrachi hasyajatra fame vanita kharat shared post for boyfriend sumit londhe sakal
मनोरंजन

Vanita Kharat: खरातांचा जावई! अभिनेत्री वनिता खरातनं निवडला 'साथी'..

नीलेश अडसूळ

vanita kharat: गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे अभिनेत्री 'वनिता खरात'. तिनं साकारलेली उत्तरप्रदेशची बाई असो, सासूबाई, मामी असो किंवा लहान मुलगी.. तिच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला हसवलं आहे. नुकतीच तिने इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट केली आहे. या पोस्ट मधूनच प्रथमच तिच्या प्रियकराचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे वनिता सध्या चर्चेत आली आहे. (maharashtrachi hasyajatra fame vanita kharat shared post for boyfriend sumit londhe)

सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात हिने प्रेमाची कबुली दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. वनिताने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इन्स्टाग्रामवर त्यांचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या निमित्ताने वनिताने जाहिररित्या प्रेमाबद्दल सांगितले आहे. सुमित लोंढे असे वनिताच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. कुछ तूने सी है मैंने की हैं रफू….ये डोरियां …….हॅप्पी बर्थडे 'साथी' असे हटके कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

तिच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये कलाकारांच्याही कमेंट्स आहेत. अभिनेते समीर चौगुले, अभिनेत्री नम्रता संभेराव, ओंकर राऊत यांनीही तिच्या पोस्टवर कमेंट करत सुमीतला शुभेच्छा दिल्या आहेत. तर सुमितनेही प्रतिक्रिया देत सर्वांचे आभार मानले आहे.

सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सुमीतने या आधी बऱ्याचदा दोघांचे एकत्र फोटो शेअर केले आहेत. पण वनिताने मात्र पहिल्यांदाच त्यांच्या नात्याबाबत जाहीर पोस्ट केली. त्यामुळे लवकरच ते लग्नबंधनात अडकतील असे संकेत आता दिसत आहेत. त्या दोघांनाही नेटकऱ्यांनी खूप सारे प्रेम दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: टीका झाली, पण भिडू घाबरला नाय! फायनलमध्ये दुबेने दाखवली बॅटची ताकद

Ind vs Sa T20 WC Final Live Score : अक्षर पटेल पुन्हा ठरला संकटमोचक, आक्रमक खेळणाऱ्या स्टब्सला धाडलं माघारी

Virat Kohli : टी 20 वर्ल्डकपच्या फायनलचा किंग! विराटच्या संथ अर्धशतकानं पकडला वेग, रोहितचा विश्वास ठरवला सार्थ

SBI News : 'एसबीआय'ला नवीन चेअरमन; दिनेश खारांच्या जागी 'यांना' संधी? कशी होणार निवड?

Rishabh Pant: 'डक'वर आऊट होणाऱ्या पंतची लज्जास्पद कामगिरी! टी20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासात नोंद झाली विकेट

SCROLL FOR NEXT