maharashtrachi hasyajatra special programme in Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti  SAKAL
मनोरंजन

Maharashtrachi Hasyajatra: अंनिसच्या कार्यक्रमात हास्यजत्रेचा जागर, हमीद दाभोलकरांनी मानले कलाकारांचे आभार

हमीद दाभोलकरांनी हास्यजत्रेतील कलाकारांचे आभार मानले आहेत.

Devendra Jadhav

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम सर्वांच्या आवडीचा. हास्यजत्रेने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो जितकं प्रेक्षकांना हसवतो तितकंच तो सामाजिक भान जपताना दिसतो.

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोने नुकतंच डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस) साठी खास कार्यक्रम केलाय. त्यामुळे हमीद दाभोलकरांनी हास्यजत्रेतील कलाकारांचे आभार मानले आहेत.

(maharashtrachi hasyajatra special programme in Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti )

हमीद दाभोलकरांनी मानले हास्यजत्रेचे आभार

"सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि समीर चौघुले हे महाराष्ट्राचे आवडते लेखक दिग्दर्शक आणि कलाकार अनिस चा हास्य जागर या कार्यक्रमाला आले आणि त्यांच्या टीम सोबत दोन खळखळून हसवणारी तरीही विचार करायला भाग पाडणारी स्किट सादर केली ...त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ते मोठे आहेतच त्यांचे माणूस म्हणून मोठे पण या निमित्ताने अनुभवता आले..अशी माणसं सामाजिक कामाच्या सोबत उभी राहतात तेव्हा अनिस सारख्या प्रवाहाच्या विरोधात पहाण्याचे काम करणाऱ्या चळवळींना ते खूप आधराचे असते. कार्यकर्त्यांचा काम करण्याचा उत्साह त्याने दुप्पटीने वाढतो...कृतज्ञता दोन्ही सचिन सर ,समीर दादा आणि सगळी टीम..." अशी पोस्ट करत हमीद दाभोलकरांनी हास्यजत्रा टीमचे आभार मानले आहेत.

हास्यजत्रा पुन्हा सुरु झाली

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या ब्लॅक अँड व्हाईट प्रोमोत दत्तु मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौगुले आणि वनीता खरात दिसत आहेत.

पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोदवीर आहेत तयार! ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत’ तुमचं सहकुटुंब स्वागत… पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या! असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आलाय

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो 14 ऑगस्टपासून, सोम.-गुरु., रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर पुन्हा सुरु झालाय.

हास्यजत्रा टीमचा ब्रेक

काही महिन्यांपुर्वी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय शो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्राने ब्रेक घेतला होता. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रेक्षकांचा निरोप घेऊन काही महिन्यांचा ब्रेक घेतला होता.

स्वतः हास्यजत्रेतील कलाकारांनी याविषयी माहिती दिली होती. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोच्या जागी KBC शो सुरु आहे. आता १४ ऑगस्ट पासुन महाराष्ट्राची हास्यजत्रा पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळुन हसवतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT