dsp movie sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : डीएसपी : चेहरा, कथा सर्वच थंड!

विजय सेतुपती हे नाव गेली तीन वर्षं ओटीटीची पारायणं करणाऱ्यांना नवीन नाही. जबरदस्त ॲक्शन चित्रपटांपासून ‘९६’सारख्या लव्हस्टोरीमुळं तो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

महेश बर्दापूरकर

विजय सेतुपती हे नाव गेली तीन वर्षं ओटीटीची पारायणं करणाऱ्यांना नवीन नाही. जबरदस्त ॲक्शन चित्रपटांपासून ‘९६’सारख्या लव्हस्टोरीमुळं तो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

विजय सेतुपती हे नाव गेली तीन वर्षं ओटीटीची पारायणं करणाऱ्यांना नवीन नाही. जबरदस्त ॲक्शन चित्रपटांपासून ‘९६’सारख्या लव्हस्टोरीमुळं तो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. अशा हुकमाच्या एक्क्याला घेऊन चित्रपट काढल्यास यश निश्‍चितच, असं गृहीत धरून पोनराम या दिग्दर्शकानं ‘डीएसपी’ या चित्रपटाचा घाट घातला. मात्र, अत्यंत लांबलचक कथानक, सेतुपतीचा सुरवातीपासून हरवलेला सूर आणि कर्कश संगीत यांमुळं हे तीन तासाचं रॅगिंगच ठरतं.

ॲक्शन-कॉमेडी असा काहीसा जॉनर असलेल्या ‘डीएसपी’चा सुरवातीचा शॉट भन्नाट आहे. मात्र, तो मध्यावर पोचल्यानंतर पुढील कंटाळवाण्या चित्रपटाचा अंदाज येतो. (पुन्हा हे तमीळ, मल्याळम सिनेमे हिंदी डबिंगमध्ये पाहण्यात नवीनच डोकेदुखी झाली आहे. या तमीळ चित्रपटाच्या हिंदीतील डबिंगमधील गावाचं नाव आहे देहू रोड आणि गुंड चक्क कांदिवली रमेश!) तर, सिनेमाचा नायक वास्कोदीगामा (विजय सेतुपती) अर्थात डीएसपी आहे आणि तो ‘मला मारणं कोणालाच शक्य नाही,’ असं म्हणणाऱ्या गुंडाला बुकलून काढतो आणि कथा सुरू होते. या कामगिरीबद्दल त्याला आपल्या गावाला, देहू रोडला, बदलीची ऑफर मिळते. तिथं जाताना फ्लॅशबॅकमध्ये त्याचं पूर्वायुष्य समजतं.

गावातील (इथं उत्तर प्रदेशातून आलेले) कोणा बैदा रवी (प्रभाकर) नावाच्या गुंडाची सर्वत्र दहशत असते. राजकीय वरदहस्त असलेल्या या गुंडामुळं आपल्या नायकाचंही नुकसान झालं आहे. आता डीएसपी झाल्यावर त्याला बदला पूर्ण करायचा आहे. त्यासाठी तो गावात येतो, मात्र आता आमदार झालेला बैदा रवी वास्कोचं जगणं मुश्‍कील करतो. मध्येच चवीला एक नायिका, तिचं आणि एका गुंडाचं लग्न, तो मोडून वास्कोनं घेतलेली आघाडी असं उपकथानक, काही एन्काउंटर असा भाग येऊन पुरेसं बोअर करून जातो. आता क्लायमॅक्सला वास्को आणि बैदाची हाणामारी जबरदस्त होणार असं समजून आपण सावरून बसतो. एक-दोन हात फिरवल्यावर दोघं हाणामारीत टी-ब्रेक घेतात! पुढच्या काही सेकंदांत कथा आणि हे रॅगिंग संपलेलं असतं...

इतर भाषक प्रेक्षक बहुतांश वेळा दिग्दर्शक आणि कलाकारांचं पूर्वीचं काम पाहून चित्रपट पाहण्याचं ठरवतात. इथं विजय सेतुपतीच्या बाबतीतला अंदाज पूर्णपणे चुकतो. फारसा अभिनय न करता, थंड चेहऱ्यानं वावरत तो कथेवर ताबा मिळवतो. या कथेत मात्र त्याचं थंड राहणं असह्य होत जातं. कथेत थोडाही दम नसताना नायकाचं असं कडेकडेनं खेळणं महागात पडतं. नायक आता काही करेल, पुढच्या प्रसंगात नक्की करणार असं वाटत असताना शेवटच्या प्रसंगापर्यंत तो फारसं काहीच करीत नाही आणि शेवटही अक्षरशः काही सेकंदात उरकला जातो. इतर कलाकारही फक्त आडदांड आहेत आणि हातोडे, कोयते घेऊन हाणामाऱ्या करण्याशिवाय त्यांना काही काम नाही. कथेला नायिका आहे शंकाही कोणाला येणार नाही, याची दक्षता दिग्दर्शकानं घेतील आहे.

थोडक्यात, विजय सेतुपती या नावाला भुलून पाहायला जाल, तर एका थंड चेहऱ्याचा नायक आणि तेवढीच थंड कथा पाहण्याचे दुर्भाग्य तुम्हाला लाभेल. हिंमत असेल तर नेटफ्लिक्सवर लॉगइन करून धोका पत्करा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT