आलिया भटचे वडील आणि चित्रपट निर्माता महेश भट लवकरच आजोबा बनणार आहेत. रणबीर कपूरबरोबर आलिया भट लवकरच आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. 'सास, बहू और बेटिया' या कार्यक्रमात महेश भट यांनी मुलगी आलिया भटच्या (Alia Bhatt) गरोदरपणावर प्रतिक्रिया दिली आहे. महेश भट (Mahesh Bhatt) म्हणतात, आलिया भट माझी मुलगी, आई होणार आहे. आजोबाचा रोल करणे माझ्यासाठी अवघड राहील. (Mahesh Bhatt Reaction On Alia Bhatt Pregnancy, Says Role Play Difficult)
आजोबाने येणाऱ्या बाळाबाबत दिली प्रतिक्रिया
महेश भट मुलगी आलिया भटसाठी खूपच आनंदीत आहेत. आलियाने नुकतेच रणबीर कपूरबरोबर आपल्या गरोदर असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले, की दोघेही लवकरच आईबाबा बनणार आहेत. 'सास, बहू और बेटिया' कार्यक्रमात महेश भट म्हणतात, धन्यवाद हा असा रोल आहे, जो करण्यासाठी थोडा अवघड असेल. याबरोबर त्यांनी आलियाविषयी अभिमान व्यक्त करत आपल्या यशाविषयी सांगितले.
आलिया भटने दोन छायाचित्रे पोस्ट केली होती. त्याच्या माध्यमातून अभिनेत्रीने आई होण्याची आनंदाची बातमी दिली होती. पहिल्या छायाचित्रात ती दवाखान्यातील पलंगावर झोपून आहे. तिची सोनोग्राफी होत आहे. संगणकाचा पडद्याला ब्लर करत त्यावर हार्ट इमोजी बनवले आहे. आलिया आणि रणबीरने वर्ष २०१७ पासून डेट करण्यास सुरुवात केली होती. चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर त्यांचे प्रेम वाढू लागले. आलिया आणि रणबीर या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या बाॅलीवूड जोडप्याचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.