mahesh manjrekar shivaji satam participate in kon honaar crorepati show on sony marathi with sachin khedekar  sakal
मनोरंजन

जब मिल बैठे तीन यार! मांजरेकर, शिवाजी साटम आणि सचिन खेडेकरांनी एकमेकांची सगळीच गुपितं बाहेर काढली..

'कोण होणार करोडपती' मध्ये मैत्री विशेष भाग..

नीलेश अडसूळ

जनसामान्यांचा  लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. दर शनिवारी या शो मध्ये काही खास पाहुणे भेटीला येत असतात. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात' अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते शिवाजी साटम हे हॉट सीटवर येणार आहेत.

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याशी गप्पा रंगणार आहेत.

या जुन्या मित्रांसोबत रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. त्याशिवाय 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर तीन जुने मित्र एकत्र येणार आहेत. ते पाहणे नक्कीच गमतीदार असेल.

(mahesh manjrekar shivaji satam participate in kon honaar crorepati show on sony marathi with sachin khedekar)

पहिल्यांदा झालेली भेट ते आत्तापर्यंत एकत्र केलेली सगळी कामे यांबद्दलचे किस्से प्रेक्षकांना पाहायला मिळतील. महेश मांजरेकर, शिवाजी साटम आणि सचिन खेडेकर यांच्या मैत्रीचे अनोखे बंध आपल्याला या विशेष भागातून पाहायला मिळणार आहेत.

सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांचा गप्पा फारच रंगल्या. शिवाजी साटम यांनी आपले पहिले नाटक संगीत वरदान या वेळचा किस्सा सांगत पहिल्यांदा ते प्रेक्षकांना कसे सामोरे गेले याची आठवण सांगितली. (kon honar crorepati)

त्या वेळी महेश मांजरेकर यांनी 'कूछ तो गडबड है' असे म्हणत शिवाजी साटम यांची फिरकी घ्यायचा प्रयत्न केला. महेश मांजरेकर यांनी आपल्या पहिल्यावाहिल्या ऑडिशनची आठवण या वेळी सांगितली.

मैत्री विशेष अशा या भागात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्या आजवरच्या मैत्रीचे किस्से पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांना एकाच वेळी एकाच मंचावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. महेश मांजरेकर स्वतः कॅन्सरच्या आजारातून बरे होऊन आले आहेत, तर कॅन्सर पेशंट्सना कोणत्याही प्रकारे जी काही मदत करता येईल, त्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेणार, असे त्यांनी सांगितले. हा विशेष भाग १७ जून, शनिवारी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT