mahesh manjrekar slams sarcastically to all contestant in bigg boss marathi sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: स्पर्धकांच्या माना शरमेनं खाली.. मांजरेकरांनी गोड बोलून जिरवली!

बिग बॉसच्या घरात अशी पहिलीच चावडी घडली,जिथे मांजरेकर शांत होते.

नीलेश अडसूळ

bigg boss marathi: स्पर्धकांनी या आठवड्यात जरा जास्तच राडा घातला. म्हणजे शिवगाळ, अरेरावी तर केली पण मारामारी करायची तेवढी बाकी ठेवली. त्यामुळे घरातले वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. या आठवड्यात चावडीवर मांजरेकर सर्वांची जिरवणार, त्यांच्यावर रागावणार अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती. पण झाले उलटेच.. मांजरेकरांनी स्पर्धकांची गोड बोलून जी काही वाट लावली ते पाहून स्पर्धकांनाही स्वतःची लाज वाटली.

(mahesh manjrekar slams sarcastically to all contestant in bigg boss marathi)

बिग बॉस मराठीचा खेळ सुरू होऊन आता 60 दिवस उलटून गेलेत. जसजसे दिवस कमी होतायत तसतसे घरातले वातावरण अधिक बिघडत चालले आहे. घरात सध्या रोज नवीन राडा सुरू आहे. अक्षय - प्रसाद मध्ये झाला जोरदार राडा असो किंवा अपूर्वा- विकासचं कडक्याचं भांडण.. किंवा अमृता आणि प्रसादची बाचाबाची.. त्यामुळे घरात या आठवड्यात फक्त क्लेश पाहायला मिळाला. स्पर्धकांनी एकमेकांना शिव्या दिल्या, खालच्या पातळीवर येऊन भाष्य केलं अगदी हात उचलण्यापर्यंत मजल गेली. त्यामुळे मांजरेकर स्पर्धकांवर चांगलेच नाराज होती.

बिग बॉस मराठीच्या घरात दर वीकेन्डला भरणारी चावडी हा शो मधला सर्वात महत्त्वाचा भाग. तो याकारणानं कारण याच ठिकाणी महेश मांजरेकर घरातील सदस्यांचा आठवड्याभराचा हिशोब मांडताना दिसतात. कुणी काही चांगली गोष्ट केली असेल तर ते प्रशंसा देखील करतात आणि कुणी घरात चुकीचं वागलं असेल तर त्याला खडे बोल सुनावताना देखील दिसतात. अगदी स्पर्धकांची खरडपट्टी देखील काढतात.. त्यामुळे चावडीसाठी प्रेक्षक आतुर असतात. पण या आठवड्यातली चावडी प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहणारी होती.

यावेळी मांजरेकरांनी स्पर्धकांवर रागावण्याऐवजी, त्यांची खरडपट्टी काढण्याऐवजी वेगळाच सूर लावला. मांजरेकरांचे हे रूप पाहून प्रेक्षक आणि घरात बसलेले स्पर्धक सर्वांनाच धक्का बसला. मांजरेकर सुरुवातीलाच स्पर्धकांची परवानगी घेऊन बोलत होते, मध्येच त्यांची माफी मागत होते. त्यामुळे स्पर्धकही घाबरले. आज मांजरेकरांना काय झालाय असा प्रश्न पडला.

पुढे हळूहळू मांजरेकरांनी अक्षय केळकर कडे मोर्चा वळवला. तो कसा शहाणा आहे, घरात त्यालाच कसं सगळं कळतं यावर मांजरेकरांनी गोड बोलून भाष्य केलं. राखी सावंतलाही ते बोलले. तर अमृता धोंगडे जय पद्धतीने आरडाओरड करते त्याचं कौतुक करायला हवं.. असंही ते उपरोधाने म्हणाले. पुढे अक्षय आणि प्रसादचे शिव्या आणि मारामारीचे प्रकारण समोर आले. त्यावेळीही मांजरेकरांनी पुन्हा कौतुकच केले. त्यामुळे आपण खूप माती खाल्ली आहे हे स्पर्धकांच्या लक्षात आलं आणि सगळ्यांच्या माना खाली गेल्या..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT