Juna Furniture : आता ते आणखीन एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘जुनं फर्निचर’ असे त्या चित्रपटाचे नाव असून सत्य-सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शन सोहळा नुकताच दादर-शिवाजी पार्क येथे पार पडला.
सलीम खान यांच्या हस्ते हा टीझर प्रदर्शित करण्यात आला.यावेळी राजकीय मंडळींबरोबरच महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर अशी चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित होते.
यादरम्यान महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधला. यतीन जाधव यांची निर्मिती असलेला हा चित्रपट महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत. हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही महेश मांजरेकर यांचेच आहेत.
तरुणाईला घरातील, घराबाहेरील वयस्क व्यक्ती म्हणजे ‘ओल्ड फर्निचर’ वाटतात; परंतु याच जुन्या फर्निचरचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, ‘‘हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडिंगमध्ये आहेत.
त्यापैकीच हा ‘ओल्ड फर्निचर’ म्हणजेच ‘जुनं फर्निचर’. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली ‘जुनं फर्निचर’ म्हटले जाते; परंतु हेच जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते, हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.