mahima 
मनोरंजन

मंदिरा बेदीच्या पतीच्या निधनानंतर महिमा चौधरी का झाली ट्रोल?

'असंवदेनशीलेचीही सीमा असते', नेटकऱ्यांनी व्यक्त केला राग

स्वाती वेमूल

अभिनेत्री मंदिरा बेदीचा Mandira Bedi पती राज कौशल Raj Kaushal यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. बुधवारी पहाटे कार्डिअॅक अरेस्टने त्यांचे निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. राज यांच्या अंत्यसंस्काराला इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. रोनित रॉय, आशिष चौधरी, मौनी रॉय यांनी मंदिराचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. यात आता अभिनेत्री महिमा चौधरी Mahima Chaudhary मात्र सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागली आहे. राज यांच्या निधनावर व्यक्त होत असताना महिमाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. (Mahima Chaudhary gets brutally trolled for being insensitive while expressing grief on mandira bedi husband Raj Kaushals death)

आपल्या मुलांसोबत बाहेर जात असताना महिमाला पापाराझींनी राज यांच्याविषयी विचारलं. त्यावेळी महिमाने राजसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. "मी जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आले, तेव्हा राज यांनीच मला गणेश चतुर्थीचा उत्सव कसा साजरा केला जातो, हे दाखवलं", असं ती म्हणाली. यासोबतच महिमाने तिच्या मोबाइलमधील राज यांचा जुना फोटोसुद्धा दाखवला. मात्र यावेळी बोलताना तिच्या चेहऱ्यावरील हावभाव नेटकऱ्यांना खटकले. 'असंवदेनशीलेचीही सीमा असते', अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. तर 'ती खरंच दु:ख व्यक्त करतेय का', असा सवाल दुसऱ्याने केला.

मंदिरा बेदी आणि राज कौशलने १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना तारा ही मुलगी आणि वीर हा मुलगा आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मंदिरा आणि राजने चार वर्षीय ताराला दत्तक घेतलं. राजने 'अँथनी कौन है' (२००६), 'शादी का लड्डू' (२००४), 'प्यार मे कभी कभी' (१९९९) या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT