"रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळताच लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायचा."
नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये महिमा चौधरीचं Mahima Chaudhry नाव आवर्जून घेतलं जातं. 'परदेस' या पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षक-समिक्षकांना प्रभावित केलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिमाने गेल्या २० वर्षांत बॉलिवूडमध्ये झालेल्या बदलाबद्दल तिचं मत मांडलं. "बॉलिवूडमध्ये आधी निर्माते-दिग्दर्शक व्हर्जिन अभिनेत्रींची मागणी करायचे. मात्र आता इंडस्ट्री बदलत आहे. आता इंडस्ट्रीत अभिनेत्रींना चांगल्या संधी मिळत आहेत," असं ती म्हणाली. आधीच्या तुलनेत आता अभिनेत्रींना चांगलं मानधन आणि भूमिका मिळण्याबद्दल तिने आनंद आणि समाधान व्यक्त केलं.
'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत महिमा म्हणाली, "इंडस्ट्रीत आता अभिनेत्री फार काळ टिकू शकत आहेत. आधी इंडस्ट्रीत तुम्ही एखाद्या व्यक्तीला डेट करू लागलात तर लगेच त्याविषयी चर्चा होऊ लागते. कारण तेव्हा फक्त निर्माते, दिग्दर्शकांना व्हर्जिन, किस न केलेल्या अभिनेत्री पाहिजे होत्या. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळताच लोकांच्या भुवया उंचावतात. लग्न झालं असेल तर प्रश्नच संपला. तुमचं करिअर संपुष्टात आलं असं समजायचं. त्यातूनही बाळ असेल तर सगळंच संपलं."
फक्त अभिनेत्रीच नव्हे तर गोविंद आणि आमिर खान यांनीसुद्धा लग्न केल्याचं लपवलं होतं, असं तिने सांगितलं. "जेव्हा कयामत से कयामत तक हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा आमिरचं लग्न झालं होतं हे कोणालाच माहित नव्हतं. गोविंदाच्या बाबतीतही असंच होतं. त्यांच्या मुलांचे फोटो कधीच छापले जायचे नाहीत किंवा इतरांना दाखवले जायचे नाही. आता हे संपूर्ण चित्र बदललं आहे. आता अभिनेत्रींना त्यांच्या लग्नानंतरही रोमँटिक भूमिका मिळतात. अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आनंद व्यक्त केला जातो. आधी तर अभिनेतेसुद्धा त्यांचं रिलेशनशिप स्टेटस सगळ्यांपासून लपवायचे. त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर किंवा काही वर्षांनंतर त्यांच्या लग्नाबद्दल कळायचं", असं ती पुढे म्हणाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.