Maine Pyar Kiya inside story Esakal
मनोरंजन

Maine Pyar Kiya चे शूट अर्ध्यातच थांबवणार होते भाग्यश्री अन् सलमान..दिग्दर्शकासमोर ठेवलेली 'ही' अट

भाग्यश्रीनं नुकत्याच एका मुलाखतीत 'मैनै प्यार किया' सिनेमाच्या शूट दरम्यानचा हा किस्सा सांगितला अन् तो ऐकून सगळेच हैराण झाले.

प्रणाली मोरे

Maine Pyar Kiya: १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्यांचा सिनेमा 'मैने प्यार किया' मध्ये सलमान खान आणि भाग्यश्री यांच्या जोडीला खूप पसंत केलं गेलं होतं. या सिनेमाच्या माध्यमातून भाग्यश्रीनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं तर सलमानचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला सिनेमा होता तो. या सिनेमाला लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि बॉक्स ऑफिसवर सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला.(Maine Pyar Kiya actress Bhagyashree shares story when she shoot a film with sooraj barjatya)

सिनेमाला रिलीज होऊन ३३ वर्षाहून अधिक काळ झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीनं शूटिंग दरम्यान एक किस्सा सांगितला जो हैराण करणारा आहे. तिनं आणि सलमाननं म्हणे सेटवर दोघांनी ठरवलं होतं की सिनेमाचं शूटिंग थांबवायचं. आणि त्याबदल्यात सूरज बडजात्या यांच्यापुढे आपली एक मागणी ठेवायची.

या किस्स्याविषयी भाग्यश्रीनं इन्स्टंट बॉलीवूडशी संवाद साधला आहे. 'मैने प्यार किया' च्या शूटिंग दरम्यान सूरज बडजात्या यांचे लग्न विनीता यांच्यासोबत झाले होते. भाग्यश्री म्हणाली की ते सगळे शूटिंगसाठी ऊटीमध्ये होते. त्यावेळी जसं सूरज बडजात्या यांच्या सिनेमाच्या सेटवर लंच ब्रेक दरम्यान जेवणाचा मोठा टेबल लागतो तसाच माहौल 'मैने प्यार किया' च्या सेटवर होता.

भाग्यश्री पुढे म्हणाली की, ''सूरज बडजात्याची पत्नी जेवणाच्या टेबलवर प्लेटमध्ये जेवण घेऊन वाट पाहत होती की सूरज येतील आणि ती त्यांना जेवण वाढेल. पण सूरज बडजात्या काही येईनात,ते शूटिंगमध्ये व्यस्त होते''.

ज्यानंतर भाग्यश्री आणि सलमान खान यांनी ठरवलं की ते दोघे तोपर्यंत सिनेमाचं शूट करणार नाहीत जोपर्यंत सूरज बडजात्या येऊन आपल्या पत्नीच्या हातानं जेवण खाणार नाहीत.

'मैने प्यार किया' सिनेमात सलमान खाननं प्रेम ही व्यक्तिरेखा साकारली होती तर भाग्यश्रीनं सुमन ही व्यक्तिरेखा साकारली होती. सलमान-भाग्यश्रीची जोडी, 'मैने प्यार किया' सिनेमा आणि त्यातील गाणी खूप प्रसिद्ध झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT