virajas kulkarni 
मनोरंजन

'प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतो'; विराजस मालिका सोडणार?

'माझा होशील ना' मालिकेतून विराजस घराघरात पोहोचला.

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'माझा होशील ना' Majha Hoshil Na या लोकप्रिय मालिकेच्या आगामी भागाचा एक लहानसा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आदित्यला गोळी लागताना दिसत असून तो खाली कोसळतो. विराजस कुलकर्णीनेच Virajas Kulkarni हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरून शेअर करून मालिकेच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. तसंच त्याने कॅप्शनमध्ये असं देखील म्हटलं आहे कि, "प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतोच. तुम्ही सर्वांनी आधीच्या पूर्ण प्रवासात साथ दिली. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आभार. आता तुमच्या प्रार्थनांची गरज आहे." विराजसच्या या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे आणि तो आता मालिका सोडणार की काय अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. (majha hoshil na fame virajas kulkarni cryptic post about serial viral on social media)

त्याचवेळी गौतमी देशपांडे हिनेदेखील एक असा फोटो शेअर केला आहे ज्याने या गोंधळात अजून भर पडली आहे. हातात पिस्तूल घेऊन गोळी झाडणाऱ्या सईचा हा फोटो असून या दोन्हीचा एकमेकांशी काय संबंध आहे? खरंच आदित्यचा मृत्यू होणार आहे का? सईच आदित्यवर हल्ला करणार का? की कोणा दुसऱ्याने केलेल्या हल्याला परतवून लावण्यासाठी सईने हातात शस्त्र घेतलं आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

'माझा होशील ना' मालिकेच्या पुढच्या काही भागात या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे. आदित्यला त्याच्या पूर्वायुष्याबद्दल आणि तो आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचा मालक असल्याबद्दलही कळणार आहे. त्यामुळे या हल्ल्याचा आणि आदित्यच्या पूर्वायुष्याचा संबंध नसेल ना हे पाहणं औस्त्युक्याचं ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: एक्झिट पोल येताच देवेंद्र फडणवीस मोहन भागवतांच्या भेटीला; संघ मुख्यालयात खलबतं

Sports Bulletin 20th November : भारतीय क्रिकेटपटूंनी बजावला मतदानाचा हक्क ते लिओनेल मेस्सी १४ वर्षांनी पुन्हा भारतात येण्याची शक्यता

Exit Poll: महाराष्ट्राचा महानिकाल! भाजपच राहणार सर्वात मोठा पक्ष, पण सरकार...; एक्झिट पोल्स काय सांगतात? जाणून घ्या

Exit Poll : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे कुणाला मिळणार जास्त जागा? Chanakya Strategy Exit Poll काय सांगतो?

EXIT POLL: एक्झिट पोल आले! सरकार कुणाचं येणार? महाविकास आघाडी की महायुती?

SCROLL FOR NEXT