Anita Date Gives reply to Trollers 
मनोरंजन

किरण मानेंना पाठिंबा दिल्याने ट्रोल करणाऱ्यांना अनिता दातेंचं मार्मिक उत्तर

'जात आता आम्ही मानत नाही असं म्हणताना छुप्या पद्धतीने जात मानायची असते.'

स्वाती वेमूल

सोशल मीडियावर राजकीय मत व्यक्त केल्याने अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेतून बाहेर काढल्याचं बोललं जात होतं. मात्र मालिकेचे दिग्दर्शक व कलाकारांनी हा दावा खोडून काढत किरण माने यांना त्यांच्या गैरवर्तणुकीमुळेच मालिकेतून काढल्याचं सांगितलं आहे. याप्रकरणी काही कलाकारांनी किरण मानेंच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) यांचासुद्धा समावेश होता. 'एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने यांच्या बाजूने आहे', असं त्यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटलं होतं. मात्र त्यांच्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांच्यावर टीका केली. अशा ट्रोलर्ससाठी अनिता यांनी आणखी एक पोस्ट लिहित त्यांना मार्मिक उत्तर दिलं आहे. (Anita Date Gives reply to Trollers)

अनिता दातेंची पोस्ट-

'मागील चार दिवसांपासून किरण माने याला कोणतेही कारण न देता मालिकेतून काढून टाकण्यात आले असे तो सातत्याने विविध माध्यमातून सांगत होता. कलाकाराला त्याला त्याचे काम काढून घेताना ते का काढून घेतले हे विचारतोय तर ते त्याला सांगण्याचे सौजन्य त्या संस्थांनी दाखवले पाहिजे. ही माझी कलाकार म्हणून असलेली अपेक्षा मी मांडली. आज स्टार प्रवाह या वाहिनीने किरण मानेला त्याच्या गैरवर्तणुकीमुळे काढल्याचे सांगितले. त्याला त्या आधी समज दिली होती, हे देखील सांगितले. तसेच, आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो हे स्पष्ट केलं याबद्दल मी कलाकार म्हणून त्याचे मनापासून आभार मानते. आपले विचार नेहमीच योग्य पद्धतीने आपण मांडले पाहिजे. व्यवस्थेला प्रश्नदेखील विचारले पाहिजेत. कोणतीही दडपशाही नसावी असेच मला वाटते.

काल पासून माझ्या पोस्टवरील कमेंट्स वाचताना मला अजून काही गोष्टी जाणवल्या. जसे की..

१- सभ्यता फार कमी लोकात असते.

२- शिवी देणे चुकीचे आहे असं म्हणणारा माणूस त्याच वाक्यात शिवी देऊ शकतो.

३- अनेक माणसे सभ्य भाषेत धमकी देतात.

४- कोणी ब्राम्हणविरोधी बोलत असेल तर ब्राम्हण स्त्रीने त्याला सपोर्ट करायचा नसतो. त्यासाठी टक्याची भाषा वापरतात.

५- काय चूक, काय बरोबर हे शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण आपल्या जातीच्याच बाजूने बोलायला हवं. जात आता आम्ही मानत नाही असं म्हणताना छुप्या पद्धतीने जात मानायची असते.

अशा अनेक गोष्टी यानंतर देखील मला कमेंटमध्ये वाचायला मिळतील. माणूस म्हणून मला समृद्ध होण्यासाठी फारच मदत होईल', अशा शब्दांत त्यांनी ट्रोलर्सना मार्मिक उत्तर दिलं.

आरोपांवर किरण मानेंचं स्पष्टीकरण-

"मी सेटवर गैरव्यवहार केला नाही. जर मी गैरवर्तणूक करत होतो, तर कलाकार का गप्प होते? ही वेगळीच स्क्रीप्ट लिहिली जात आहे. अशा गोष्टींना मी घाबरत नाही. माझ्या राजकीय पोस्टमुळेच मला मालिकेतून काढण्यात आलं आहे. मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसविरोधात मी कोर्टात लढणार. माझ्या नावाची बदनामी सुरू आहे. शर्वणी पिल्लई आणि सविता मालपेकर या माझ्या बहिणी आणि आईसारख्या आहेत. एवढे दिवस त्यांनी माझा त्रास का सहन केला? मी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन केलं नाही. याविरोधात मी शेवटपर्यंत लढा देणार, मला मालिकेत परत नाही घेतलं तरी चालेल", अशी प्रतिक्रिया मानेंनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT