Delhi High Court On Jailer Movie: सुपरस्टार रजनीकांत हा सध्या त्याच्या 'जेलर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहे. केवळ भारतातच नाही तर देशातच हा सिनेमा रेकॉर्ड करत आहे.
चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवड्यांहून अधिक दिवस झाले असले तरी त्याची क्रेझ काही केल्या कमी होतांना दिसत नाही. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर'ने आता 318 कोटींच्या वर कमी केली आहे.
मात्र एकीकडे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होत असतांना दुसरीकडे हा सिनेमा वादात देखील अडकला होता. या चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेण्यात आला होता.
खरं तर, चित्रपटाच्या एका दृश्यात एक कॉन्ट्रॅक्ट किलर आरसीबीच्या जर्सीत दाखवण्यात आला होता. या सीनमुळे मोठा वाद सुरु झाला होता. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेलं.
आता यावर सुनावणी करत हायकोर्टाने चित्रपटाच्या निर्मात्यांना 1 सप्टेंबरपर्यंत चित्रपटातील त्या सीनमधून आरसीबीची जर्सी काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
त्याचबरोबर टिव्ही किंवा कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर हा सिन दाखवण्यात येवू नये असे देखील सांगितले.
रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडला जेव्हा समजलं की जेलर चित्रपटात एक सीन आहे ज्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट किलरने महिलेबद्दल अपमानजनक विधान करतांना आरसीबी जर्सी घातली आहे, त्यानंतर त्यावर आक्षेप घेत त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.
या सीनमुळे त्याच्या ब्रँडची प्रतिमा खराब होण्याची आणि प्रायोजकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवत त्यांनी ही याचिका दाखल केली होती. आता यावर कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.