Actor Leena Kumar Marriage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी इस्रोच्या 'गगनयान' मोहिमेतील अंतराळवीरांची नावे जाहीर केली. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो पुढील वर्षी या अंतराळवीरांना स्पेसमध्ये पाठवणार आहे. या मोहिमेतील एक अॅस्ट्रोनॉट प्रशांत नायर यांच्याशी आपण लग्न केल्याची माहिती मल्याळम अभिनेत्री लीना यांनी दिली. मोदींच्या घोषणेनंतर काही वेळातच त्यांनी आपल्या इन्स्टा हँडलवरुन याबाबत पोस्ट केली.
लीना (Actor Leena Kumar) या केरळमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी प्रशांत नायर यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. आपलं लग्न 17 जानेवारी रोजीच झालं होतं, मात्र आपण या मोठ्या घोषणेची वाट पाहत होतो, असं लीना यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. "नायर यांना पंतप्रधान मोदींकडून सन्मानित केलं जाणं हा एक अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे" असंही त्या म्हणाल्या.
"आज, 27 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या पंतप्रधान मोदींनी भारतीय वायुसेनेचे फायटर पायलट, ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर (Prashant Nair) यांना पहिल्या भारतीय अंतराळवीर विंगने सन्मानित केलं. हा आपल्या देशासाठी, केरळ राज्यासाठी आणि वैयक्तिक स्तरावर माझ्यासाठी देखील ऐतिहासिक क्षण आहे. आवश्यक ती गोपनीयता बाळगणं गरजेचं असल्यामुळे मी या गोष्टीची अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहत होते. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की मी 17 जानेवारी 2024 रोजी पारंपारिक पद्धतीने प्रशांतशी लग्न केलं आहे."
गगनयान मोहीम (ISRO Gaganyaan Mission) ही इस्रोची सर्वात महत्त्वाकांक्षी मोहिमांपैकी एक आहे. या माध्यमातून भारत पहिल्यांदाच स्वतः अंतराळात अंतराळवीर पाठवणार आहे. यापूर्वी भारताचे अंतराळवीर इतर देशांच्या रॉकेटमधून स्पेसमध्ये जात होते. इस्रोसाठी ही एक मोठी अचीव्हमेंट असणार आहे. नायर यांच्यासोबत या मोहिमेमध्ये ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, अजीत कृष्णन आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला हेदेखील असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.