Malayalam actor Mamukkoya passes away at 76 sakal
मनोरंजन

Mamukkoya Passes Away: मल्याळम अभिनेते मामुकोया यांचे निधन..

वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

नीलेश अडसूळ

Mamukkoya Passed Away: दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील मल्याळम अभिनेते मामुकोया (Mamukkoya) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर मामुकोया यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

(Malayalam actor Mamukkoya passes away at 76)

मामुकोया हे एका फुटबॉलशी संबंधित एका कार्यक्रमात गेले होते. त्या कार्यक्रमामध्ये ते भोवळ येऊन पडले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मामुकोया यांना काही काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि आज बुधवार २६ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

मामुकोया यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. 1979 मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी अनेक विनोदी भूमिकाही साकारल्या आहेत. हलाल लव्ह स्टोरी, कुरुथी आणि मिनल मुरली यांसारख्या चित्रपटांमध्ये  मामुकोया यांनी काम केलं. एवढेच नाही तर त्यांनी 'फ्लॅमन इम पॅराडी' या फ्रेंच चित्रपटात देखील काम केले आहे.

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'कोब्रा' या चित्रपटात मामुकोया यांनी महत्वाची भूमिका साकारली,या चित्रपटामध्ये त्यांनी साऊथचा सुपरस्टार विक्रमसोबत काम केले होते. त्यांनी कायमच आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या निधणानंतर  अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मामुकोया यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT