P Balachandran  
मनोरंजन

मल्याळम अभिनेते पी. बालचंद्रन काळाच्या पडद्याआड

स्वाती वेमूल

ज्येष्ठ मल्याळम अभिनेते, नाटककार आणि लेखक पी. बालचंद्रन यांचं निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. मल्याळम सिनेमा आणि साहित्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पद्मनाभन बालचंद्रन यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५२ रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यात झाला. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या रिचर्ड अॅटनबरो यांच्या 'गांधी' या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. यासोबतच त्यांनी त्रिवंद्रम लॉज, थँक्यू, सायलेन्स यांसारख्या चित्रपटांमध्येही दमदार भूमिका साकारल्या. 

अंकल बन, कल्लू कोंडोरू पेन्नू, पोलिस यांसारख्या चित्रपटांच्या पटकथा त्यांना लिहिल्या होत्या. २०१२ मध्ये त्यांनी 'मेघरुपन' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. कवी पी. कुन्हीरामन नायर यांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारित होती. 'पावम उस्मान' हे त्यांनी लिहिलेलं नाटक प्रचंड गाजलं. या नाटकासाठी त्यांना केरळ साहित्य अकादमी पुरस्कार आणि केरळ प्रोफेशनल नाटक पुरस्कार मिळाले होते. 

अभिनेते ममूटीची मुख्य भूमिका असलेल्या एका चित्रपटात ते शेवटचे झळकले होते. बालचंद्रन यांच्या पश्चात पत्नी श्रीलता आणि श्रीकांत, पार्वती ही दोन मुलं आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT