Malayalam Actor Vinod Thomas Found Dead Inside Car At Hotel In Kottayam Kerala Esakal
मनोरंजन

Vinod Thomas: प्रसिद्ध अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू! हॉटेलजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये सापडला मृतदेह

Vaishali Patil

Malayalam Actor Vinod Thomas Found Dead: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेते विनोद थॉमस हे पंपाडीजवळील एका हॉटेलजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये मृतावस्थेत आढळून आले आहे. ते 45 वर्षांचे होते. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना माहिती दिली की एक व्यक्ती त्याच्या हॉटेल परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये पडून आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यांना रुग्णालयात नेले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांना विनोद त्यांच्या कारमध्ये सापडला. आरडाओरडा करूनही कारचा दरवाजा न उघडल्याने गाडीच्या बाजूची काच फोडल्यानंतर विनोद यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. लोक अनेक तासांपासून बेपत्ता विनोद थॉमसचा शोध घेत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

विनोद थॉमस यांचा मृत्यू का झाले याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र कारमधील एसीमधून निघणाऱ्या विषारी वायू मुळे त्यांचा मृत्यू झाला असावा अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.

विनोद थॉमस यांनी बिजू मेनन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या अयप्पनम कोशियुम या हिट चित्रपटात काम केले.

त्याने अॅक्शन थ्रिलरमध्ये स्टीफनची भूमिका साकारली होती. यासोबतच Natholi Oru Cheriya Meenalla, June and Happy Weddings या चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT