Malini Rajurkar Classical Singer Gwaliyar Gharana death age 82 esakal
मनोरंजन

Malini Rajurkar : 'ग्वाल्हेर' घराण्याच्या शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर कालवश

मालिनी राजूरकर या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायनासाठी ओळखल्या जात असे.

युगंधर ताजणे

Malini Rajurkar Classical Singer Gwaliyar Gharana death age 82 : भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्यानं भारतीय शास्त्रीय संगीतविश्वाची मोठी हानी झाली आहे.

मालिनी राजूरकर या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायनासाठी ओळखल्या जात असे. त्यांच्या निधनाच्या बातमीनं असंख्य शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांना, जाणकारांना मोठा धक्का बसला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजूरकर यांनी त्यांच्या हैद्राबाद येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला आहे. ग्वाल्हेर घराण्यातील प्रख्यात गायिका म्हणून केवळ भारतच नाही तर जगभरात त्यांची ओळख होती.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

मालिनी राजूरकर यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले होते. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास, त्यांना २००१ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं तर २००८ मध्ये दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.

मालिनी राजूरकर यांच्याविषयी आणखी माहिती द्यायची झाल्यास त्यांचे बालपण हे राजस्थानमध्ये गेले. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ सालचा. त्यांनी अजमेर येथील संगीत महाविद्यालयातून संगीताचे शिक्षण घेतले. यावेळी त्यांना गोविंदराव राजूरकर आणि त्यांचे पुतणे वसंतराव राजूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

मालिनी राजूरकर यांनी देशभरातील विविध संगीत महोत्सवांमध्ये गायन केले. त्यांचा श्रोतावर्ग मोठा होता. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीमुळे त्या लोकप्रिय होत्या. पुण्यातील प्रसिद्ध अशा सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये मालिनी राजूरकर यांनी गायन केले आहे. याशिवाय मुंबई, दिल्ली, राजस्थान मधील वेगवेगळ्या राज्यातील संगीत महोत्सवांमध्ये मालिनीताई राजूरकर यांच्या गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT