Best Seller Movie Sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : बेस्टसेलर : पुस्तकामागचं रहस्य

एक तुफान खपणारी ‘बेस्टसेलर’ कादंबरी लिहिणारा लेखक ताहीर वझीर (अर्जान बज्वा) आणि जाहिरातविश्वात वरच्या पदावर असणारी त्याची पत्नी मयंका (गौहर खान).

मंदार कुलकर्णी k007mandar@gmail.com

एक तुफान खपणारी ‘बेस्टसेलर’ कादंबरी लिहिणारा लेखक ताहीर वझीर (अर्जान बज्वा) आणि जाहिरातविश्वात वरच्या पदावर असणारी त्याची पत्नी मयंका (गौहर खान).

एक तुफान खपणारी ‘बेस्टसेलर’ कादंबरी लिहिणारा लेखक ताहीर वझीर (अर्जान बज्वा) आणि जाहिरातविश्वात वरच्या पदावर असणारी त्याची पत्नी मयंका (गौहर खान). दोघांच्याही जीवनात एकाच वेळी एक झुळुक आली आहे. मयंकाला पार्थ आचार्य (सत्यजीत दुबे) नावाचा तेजतर्रार सहकारी मिळाला आहे, तर ताहीरला मीनू माथुर (श्रुती हसन) नावाची एक खास चाहती भेटली आहे. यानंतर वेब सिरीजच्या ‘प्रथे’नुसार हळू हळू एकेक घडामोडी घडत जातात; ‘रोमॅंटिक एन्काउंटर’पासून खून, सायबर हल्ल्यांपर्यंत अनेक गोष्टी घडत जातात आणि एसीपी लोकेश (मिथुन चक्रवर्ती), त्यांची सहकारी (सोनाली कुलकर्णी) यांच्यासह अनेक जण गाठी कशा कशा उकलतात किंवा कशा बांधतात याची रंजक कथा म्हणजे ‘ॲमेझॉन प्राइम’वरची ‘बेस्ट सेलर’ ही वेब सिरीज.

‘ओटीटी’वर थ्रिलर वेब सिरीजची एक लाटच सध्या आली आहे तोच धागा पुढे नेणारी ही वेब सिरीज आहे. वातावरण ‘पेज थ्री’ चित्रपटाच्या जवळ जाणारं आणि त्यात थ्रिलरचा तडका असल्यानं मजा येते. पहिले काही भाग रहस्य छान टिकवलं आहे आणि घडामोडीही नाट्यमय आहेत. मात्र, नंतरचा भाग बराच प्रेडिक्टेबल आहे आणि किंचित अतर्क्य गोष्टी असल्यानं फोकस हलतो. निर्मितिमूल्यं उच्च आहेत, प्रत्येक भागात शेवटी असलेला ट्विस्ट छान आहे आणि चित्रीकरणात भव्यता आहे, हे जितकं खरं आहे, तितकंच आठ भागांचं ‘टारगेट’ गाठण्यासाठी आणि इतर सिरीजचा ‘मार्क’ गाठण्यासाठी अनेक रहस्यं आणि घटना अनावश्यक पद्धतीनं समाविष्ट केल्याचंही दिसतं.

अभिनयामध्ये सगळ्यात बाजी मारतो तो अर्जान बज्वा. त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी भूमिका मिळाली आहे आणि तिच्यात बऱ्याच शेड्सही असल्यानं त्यानं त्याचं सोनं केलं आहे. मिथुन चक्रवर्ती बऱ्याच काळानंतर दिसले आहेत. त्यांनी रहस्याला थोडा विनोदाची झालर दिली असली, तरी त्यात कृत्रिमता जाणवते. मात्र, इतक्या वर्षांचा कसबीपणा काही काही प्रसंगांत नक्कीच दिसतो. गौहर खानचं व्यक्तिमत्त्व भूमिकेला साजेलं असलं, तरी तीही अनेक प्रसंगांत अभिनयाशी झटापट करताना दिसते. श्रुती हसननं मात्र अतिशय उत्तम काम केलं आहे आणि तितकीच उत्तम कामगिरी आहे सत्यजित दुबे याची. एकूण टीमवर्क चांगलं असल्यामुळे अनेक कच्चे दुवे झाकलेही जातात. मुकुल अभ्यंकर यांनी दिग्दर्शन करताना प्रेक्षकानं आठ एपिसोड्स बघितले पाहिजेत यासाठी जे जे आवश्यक ते ते आणण्याचा प्रयत्न केला आहे.

एकुणात, वेब सिरीज विश्वात अनेक थ्रिलर्स आत्तापर्यंत आले असले, तरी पुस्तकाच्या भोवती असलेली रहस्यं हे ‘बेस्टसेलर’चं वेगळेपण आहे. या पुस्तकाचं कव्हर अतिशय चकचकीत आहे आणि काही पानं नक्कीच वाचनीय आहेत.... बाकी, शेवटची काही पानं मात्र हे पुस्तक रेंगाळलं असलं, तरी ‘फॉरवर्ड’ नावाचं बटण हा ‘बिंज-मित्र’ हाताशी असला की झालं, नाही का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT