Mangaaji fame Influencer Mangesh Kakad struggle success story inspiring journey  sakal
मनोरंजन

Mangaji: नाशिकच्या इंजिनियर पठ्ठ्याची कमाल! शेती सह अभिनय सांभाळून सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ..

मंगेश काकड या तरुणाची सक्सेस स्टोरी तुम्हालाही प्रेरणा देईल..

नीलेश अडसूळ

Mangaji fame mangesh kakad: सर्वसामान्यांमधील असामान्य प्रतिभा जगासमोर आणण्याची किमया समाजमाध्यमांमध्ये आहे. काही सेकंदं किंवा मिनिटांच्या व्हिडिओमधून लक्ष वेधून घेणारी मंडळी सोशल मीडियावर दिसतात.

समाजमाध्यमे जसजशी लोकप्रिय होऊ लागली तसतसे अनेकजण आपल्या कलागुणांचे सादरीकरण समाजमाध्यमांवरून करू लागले. आज अनेक ‘इन्फ्लुएन्सर्स’ सोशल माध्यमातून आपली कला दाखवत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

या यादीत ‘मंगाजी’ म्हणजेच नाशिकच्या मंगेश काकड या तरुणाने अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण मंगाजी फक्त व्हिडिओ करत नाही तर तो इंजिनियर आहे, शेतकरी आहे आणि एवढं करून तो नाटकातही काम करतो..

अशा भन्नाट तरुणाचा प्रवास पाहूया, जो तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल..

(Mangaaji fame Influencer Mangesh Kakad struggle success story inspiring journey )

शेतकरी कुटुंबातून आलेल्या मंगेशला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. मराठीतले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयातून प्ररेणा घेत वेगवगळ्या मिमिक्रीने सगळ्यांची दाद मिळवणाऱ्या मंगेशला आपण कला क्षेत्रात पाऊल टाकू याची कल्पना नव्हती.

मध्यमवर्गीय कुटुंब त्यामुळे शिक्षणाला महत्त्व होत. शिक्षण पूर्ण करताना सवड मिळेल तशी आपल्या अभिनयाची आवड तो जपत होता. अभ्यास आणि नाटक असा प्रवास करताना मुंबईत येऊन स्वतः:ची ओळख निर्माण करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मंगेश यांनी काही काळ नामांकित कंपनीत काम केलं.

पेशाने सिव्हिल इंजिनियर असलेल्या मंगेशला मात्र आपल्यातील अभिनयाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. अनेक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय नाटकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत अनेक सन्मान प्राप्त केले. प्रायोगिक रंगभूमीवरील ‘बट बिफोर लिव्ह’ या गाजलेल्या नाटकाचे त्यांनी महाराष्ट्रभर अनेक प्रयोग केले.

मुबंईत येण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मंगेश याने अखेर नोकरी सोडून मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला पण... कोविडचा प्रादुर्भाव आला आणि त्याचं मुंबईत येण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत आणि कोविडचं संकट याही परिस्थितीत हार न मानता त्याच्या एकपात्री अभिनय कौशल्यातून त्याने छोटे छोटे मनोरंजक व्हिडीओ तयार करून इन्स्टाग्रामवर टाकायला सुरुवात केली.

बघता बघता त्याच्या व्हिडीओजना नेटकऱ्यांची पसंती मिळू लागली आणि सोशल माध्यमावर ‘मंगाजी’ हिट झाला. आज जवळपास ‘मंगाजी’ चे इंस्टाग्रामवर आज सात लाखाहून अधिक फॉलोअर्स तर युट्युब वर एक लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत.

सध्या शेतीचं काम सांभाळून आपल्या अभिनयाची आवड व्हिडीओच्या माध्यमातून जपणारा मंगेश रंगभूमीशी असलेली आपली नाळ जोडून आहे. ‘पुन:श्च हनिमून’ या व्यावसायिक नाटकात तो सध्या काम करतोय. सोशल माध्यमावर मिळालेल्या प्रतिसादाने भारावून न जाता प्रेक्षकांना अधिकाधिक हसवणाऱ्या मंगेशला फॉलोअर्स आणि लाईकपेक्षा प्रेक्षकांचे मनोरंजन होणं खूप महत्तवाचे वाटते. ‘

फॉलोअर्स’ आणि ‘व्ह्यूज’च्या मागे न धावता आपल्या कौशल्यांवर विश्वास ठेवत आवड जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यावर मंगेश भर देतो. या माध्यमात काम करू इच्छिणाऱ्या नव्या मुलांनाही तो हेच सांगतो आगे बढो और कुछ करो यश मिळेलच. रोजच्या जगण्यात घडणाऱ्या विविध गमती जमती मिश्किलपणे सादर करणारे व्हिडिओ मंगेश तयार करतो. कलेचा हा 'मंगेश' सध्या सर्वांना अभिनयातून निखळ आनंद देऊ पाहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT