Priyanka Chopra Reacts On Manipur Violence Against Women: एकीकडे महिला भारताचं नाव ग्लोबल स्तरावर गाजवत असतानाच दुसरीकडे मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेनं डोकं सुन्न केलं आहे. लोकं अमानुषपणाच्या किती खालच्या स्तराला जाऊ शकतात याचा प्रत्यय झाला. गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिसांचार होत होता.
अशातच दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर परेड केल्याचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मणिपूर हिंसाचारावर घटनेचे पडसाद देशभरात पसरले. याबाबत देशाच्या नागरीकांमध्ये संताप कायम आहे
या घटनेनं देश हादरला अनेक संतापजनक प्रतिक्रियादेखील या घटनेवर आल्या आहेत. राजकिय नेत्यांपासून तर चित्रपट सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच या घटनेचा निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी केली. आता या घटनेवर ग्लोबलस्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने देखील तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियांका चोप्राचं मणिपूरसोबत जवळच नातं आहे. तिनं मोठ्या पडद्यावर बॉक्सर मेरी कोमची भूमिका साकारली होती. त्यामुळे तिने मणिपूरमध्ये वेळही घालवला आहे. या घटनेनं तिला देखील हादरुन सोडलं आह. तिने पोस्ट शेयर करत मणिपूरमधील हिंसाचारावर संताप व्यक्त केला आहे.
ती तिच्या पोस्टमध्ये म्हणते की, "एक व्हिडिओ व्हायरल झाला... गुन्हा घडल्यानंतर 77 दिवसांनी...कारवाई होण्यापूर्वी. तर्क? कारण? याचा काहीही फरक पडत नाही..काहीही आणि का, परिस्थिती किंवा वातावर असो, आम्ही महिलांना कोणत्याही खेळात प्यादे बनू देऊ शकत नाही. लाज आणि रागाला आता फक्त एकाच गोष्टीसाठी एकत्र येत आता आवाज उठवण्याची गरज आहे. त्वरित न्याय मिळवण्यासाठी.
प्रियांका चोप्राने आदिवासी महिलांची नग्न परेड केल्याच्या भीषण घटनेवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. 'ही सामूहिक शरमेची बाब आहे' आणि 'मणिपूरच्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे'. या घटनेला लाजिरवाणी असल्याचे सांगून त्यांनी संपूर्ण देशाला याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले.
प्रियांकापुर्वी अक्षय कुमार, उर्मिला मातोंडकर, संजय दत्त, कियारा अडवाणी, एकता कपूर, जया बच्चन, रिचा चढ्ढा, रेणुका शहाणे, रितेश देशमुख यांच्यासह अनेकांनी कलाकारांनी या या घटनेचा निषेध करत आरोपींवर कडक कारवाई मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.