Manisha Rani Latest news 
मनोरंजन

Manisha Rani Reaction : 'झलक दिखला जा' ची विजेती झाल्यानंतर समोर आली मनिषाची पहिली प्रतिक्रिया!

युगंधर ताजणे

Manisha Rani Jhalak Dikhla Ja 11 winner : मनिषा राणी ही आता झलक दिखला जा च्या अकराव्या सीझनची विजेती झाली आहे. त्यानंतर तिची (Manisha Rani Winner) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या नावाची जोरदार चर्चा होती. अखेर तिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सोशल मीडियावर एक दिवस अगोदरच मनिषाचं नाव विजयी म्हणून समोर आले होते.

टीव्ही मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सुरु असणाऱ्या रियॅलिटी (Tv Reality Show) शो मध्ये झलक दिखला जा चे नाव घेता येईल. या रियॅलिटी शो चा अकरावा सीझन पार पडला असून त्यातील सहभागी स्पर्धकांविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. अशातच मनिषा राणीनं विजेतेपद मिळवल्यानंतर तिनं दिलेल्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण आले आहे.

सोशल मीडियावर मनिषाच्या नावाची चर्चा आहे. ती विजयी होताच तिच्याव चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या सगळ्यात मनिषाची प्रतिक्रिया देखील चर्चेत आली आहे. ती नेमकी काय म्हणाली हेही आपण जाणून घेऊयात.

मनिषाला झलक दिखला जा चे विजेतेपद मिळवल्यानंतर तिला ३० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. त्यानंतर तिनं इंस्टावरुन चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिनं म्हटलं आहे की, मी माझ्या सर्व चाहत्यांचे खूप आभार मानते. त्यांच्या मुळेच हा प्रवास शक्य झाला. त्यांनी केलेल्या सहकार्याविषयी मी त्यांची आभारी आहे.

त्या व्हिडिओच्या शेवटी ती म्हणते की, मी आता जे काही पाहते आहे ते सगळं खरं आहे यावर माझा विश्वासच बसत नाही. माझ्यासाठी एक ते दीड लाख वोटिंग एका दिवसांत आली. मला एवढं प्रेम मिळालं हेच माझ्यासाठी खूप आहे. लोकांनी मला जे खूप सहकार्य केले त्यासाठी त्यांना धन्यवाद. अशा शब्दांत मनीषा राणीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Thane: मविआला संधी मिळाल्यास सर्वात आधी शिंदेंवर राग काढणार अन्...; मोदींचा ठाण्यातून घणाघात

Sitaram Dalvi Passed Away: बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ सहकाऱ्याचं निधन! राज ठाकरेंनी केली पोस्ट

IND vs BAN 1st T2OI : संजू सॅमसन ओपनिंगला, मयांक किंवा हर्षित यांचे पदार्पण? पहिल्या सामन्यासाठी भारताची संभाव्य Playing XI

Phullwanti : "त्यावेळी स्मिता तळवलकर यांच्या रूममध्ये झोपायचे" ; दिग्दर्शिका झालेल्या स्नेहल तरडे यांचा डोळ्यात पाणी आणणारा प्रवास

Latest Marathi News Live Updates: शहाड उड्डाणपुल होणार चार पदरी! एमएमआरडीएकडून निविदा जाहीर

SCROLL FOR NEXT