Akshay Kumar Mann Ki Baat : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा कधी मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना दिसतो तर कधी मॅन व्हर्सेस वाईल्डमधील बेअरसोबत जंगलात मुक्तपणे फिरतानाही दिसतो. आपल्या फिटनेसमुळे कायम चाहत्यांचा आयडल असणाऱ्या अक्कीनं आता चाहत्यांना जो सल्ला दिला आहे त्यामुळे तो चर्चेत आला आहे.
गेल्या वर्षी अक्षयचे जे पाच ते सहा चित्रपट प्रदर्शित झाले होते त्याला प्रेक्षकांनी नाकारले. त्यातील ओएमजी २ ला बऱ्यापैकी यश मिळाले. यामुळे अक्षयनं आता वेगळ्या विषयांवरील चित्रपटांना यापुढील काळात प्रेक्षकांसमोर घेऊन यायचे असा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यानं नव्या वर्षाच्या निमित्तानं चाहत्यांना जो सल्ला दिला आहे त्याच्यावर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स भन्नाट आहेत.
वयाची पन्नाशी केव्हाच ओलांडलेल्या अक्षयचा या वयातील फिटनेस नवोदित कलाकारांना लाजवणारा आहे. बॉलीवूडमधील पॉप्युलर स्टंटमॅन म्हणून त्याची वेगळी ओळख आहे. याच पार्श्वभूमीवर अक्षयनं चाहत्यांना दिलेला सल्ला महत्वाचा ठरतो. तो चाहत्यांना म्हणतो की, येत्या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हे सगळ्यात मोठे आव्हान तुमच्यासमोर असणार आहे. ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे.
अक्षयनं मन की बातमध्ये पाहूणा कलाकार म्हणून सहभाग घेतला. यावेळी त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चाहत्यांना आरोग्य आणि त्याचे येत्या काळातील महत्व यावर दिलेला सल्ला चर्चेत आला आहे. तुम्ही स्टार कलाकारांना मोठ्या पडद्यावर पाहता मात्र चित्रपट आणि रियल लाईफ यामध्ये खूप फरक आहे. चित्रपटासारखं काही खऱ्या आय़ुष्यात होत नसतं. तुम्ही कलाकारांच्या मेहनतीकडे लक्ष द्या.
रिल नव्हे तर तुम्ही तुमच्या रियल लाईफकडे लक्ष देण्याची गरज आहे. ५६ वर्षांच्या अक्षयनं असेही म्हटले आहे की, नियमित व्यायाम, योग्य आहार ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी. अक्षयला बॉलीवूडचा फिटनेस आयकॉन असेही म्हटले जाते. यावर तो म्हणाला, यापुढील काळात तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला आपले आरोग्य सुस्थितीत ठेवता येणं हीच महत्वाची गोष्ट आहे.
कलाकारांची नक्कल करणं सोडून द्या. तुम्ही तुमच्या आरोग्याची पर्वा करा. डॉक्टरांनी तुम्हाला जे काही सांगितलं आहे त्या सुचनांचे पालनही तुम्ही केले पाहिजे. दिवसेंदिवस आपली लाईफस्टाईल बदलताना दिसते आहे. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. ही गोष्ट समजून घेत त्यानुसार आपला आहार प्लॅन करा. असेही अक्षयनं म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.