Manoj Bajpayee on Film City in Bihar: मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय नावं म्हणजे मनोज बाजपेयी. बॉलीवूडमध्ये आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखले जाणारे मनोज बाजपेयी यांनी शूल, सत्या, गँग्स ऑफ वासेपूर, स्पेशल 26 सारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकरल्या आहेत . यासोबतच त्याने 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमध्ये उत्तम काम केले आहे.
'द फॅमिली मॅन' मुळे मनोज वाजपेयीनं पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलयं. बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आलेल्या मनोज बाजपेयीने मायानगरीत मोठे स्थान मिळवले आहे. तो नुकताच पाटणा येथे एका कार्यक्रमात पोहोचला होता. या त्याला राज्यात होणाऱ्या फिल्मसिटीबद्दल विचारण्यात आलं.
त्यावेळी त्याने सांगितले की, एक कलाकार म्हणून मी 15-20 वर्षांपासून सरकारकडे राज्यात फिल्मसिटी बनवण्याची मागणी करत आहे. यासोबतच राज्यात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचीही स्थापना व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.
मनोज बाजपेयी म्हणाले की, बिहारमध्ये फिल्मसिटी बनवण्याबाबत आम्ही 15-20 वर्षांपासून सरकारला निवेदन देत आहोत. अद्याप याबाबत काहीही झाले नाही. ते म्हणाले की, सरकारला विनंती करणे हेच केवळ कलाकारांच्याच हातात आहे. बाकीचे काम सरकारच्या हातात आहे.
काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादव यांची भेट घेतल्याचही त्यांने सांगितले. या भेटीतही त्यांने राज्यातील कला आणि संस्कृतीच्या विकासाबाबत चर्चा केली. त्यांने सांगितले की, राज्य सरकारने बिहारमध्ये फिल्म सिटी सुरू करण्याची मागणी केली आहे. यासोबतच राज्यात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) देखील उघडण्यात येणार यावे याबद्दलही चर्चा झाली आहे.
मनोज बाजपेयी यांच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर त्यांचा 'गुलमोहर' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. हा एक फॅमिली ड्रामा आहे. तो चित्रपट ३ मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर प्रदर्शित होत आहे. गुलमोहरमध्ये त्याच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, सिमरन आणि सूरज शर्मा आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.