Manoj Bajpayee The Fable creates history to premiere at Berlin Film : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीसाठी नवं वर्ष चांगलेच लाभदायी ठरताना दिसत आहे. त्याच्या द फेबल नावाच्या चित्रपटाचं बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्याला विशेष स्क्रिनिंगचा मान मिळाला आहे.
भारताकडून बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये पाठविण्यात आलेल्या जे चित्रपट होते त्यातून केवळ मनोजच्या द फेबल नावाच्या चित्रपटाचं समीक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. राम रेड्डी यांनी द फेबलचे दिग्दर्शन केले आहे. द फेबल या वर्षी बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसत आहे.
मनोजच्या द फेबलनं जी कामगिरी केली आहे त्यानं भारतीय चित्रपटाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेलाय. ७४ व्या एकाउंटर कॉम्पिटेशन मध्ये द फेबलनं आपल्या नावाची वेगळी मोहोर उमटवली आहे. सोशल मीडियावर मनोज वाजपेयीच्या त्या चित्रपटाचं नेटकरी कौतुक करत आहे.
मनोजचा द फेबल हा असा एकमेव चित्रपट ठरला आहे ज्यानं गेल्या ३० वर्षाचा तो रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बर्लिनच्या कॉम्पिटेटिव्ह सेक्शनमध्ये स्क्रिनिंगचा बहुमान मिळवण्याचा मान द फेबलच्या वाट्याला आला आहे. त्यासाठी भारताला ३० वर्षे वाट पाहावी लागली आहे. इंडिया टुडेनं याबाबत सविस्तर बातमी दिली आहे.
द फेबलमध्ये मनोज वाजपेयी, दीपक डोब्रियाल, प्रियंका बोस, तिलोत्तमा शोम, हिराल सिंधू, अवन पुकूट यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. द फेबलचा गौरव झाल्यानंतर मनोजनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. तो म्हणतो, द फेबलचा अनुभव खूपच रोमांचक होता. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. दिग्दर्शक राम रेड्डी यांनी मोठ्या मेहनतीनं ही कलाकृती साकारली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.