Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलनाने चांगलाच जोर धरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे गेले काही दिवस उपोषणाला बसले आहेत.
शांततेच्या मार्गाने मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरु होते मात्र या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यामुळे संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघालं आहे. आता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर सिनेमा येतोय.
(Maratha Reservation Manoj Jarange Jalna protest marathi movie producer Govardhan Doltade)
मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर सिनेमा
सामच्या वृत्तानुसार, मनोज जरांगे यांच्या जीवनावर चित्रपट बनवला जाणार आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या नावाने चित्रपट बनवणार असल्याची शक्यता आहे.
याशिवाय सिनेमाचं प्राथमिक नाव 'खळग' असल्याची माहिती मिळतेय. या सिनेमाच्या मेकिंगसाठी खळग चित्रपटाची टीम जरांगे यांच्या भेटीला गेली असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात स्वतः मनोज जरांगे पाटील हे सुद्धा भूमिका सााकारणार असल्याचं बोललं जातंय.
हा अभिनेता साकारणार मनोज जरांगे पाटील यांची भुमिका ?
मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे करत आहेत. तर डी गोवर्धन दोलताडे सिनेमाचे निर्माते आहेत. अभिनेता रोहन पाटील सिनेमात मनोज जरांगे पाटील यांची भुमिका साकारणार असं समजतंय. या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर २०२३ पासून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.
कोण आहेत, मनोज जरांगे?
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाकडून जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून मनोज मराठा आंदोलन चळवळीत सक्रिय आहेत. सर्वसामान्य परिस्थिती वाढलेल्या मनोज यांचे शिक्षण १२ पर्यंत झालं आहे. हॉटेलमध्ये काम करत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.
मनोज जरांगे हे २०११ पासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी २०१४ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले होते. याशिवाय २०१५ ते २०२३ या आठ वर्षांच्या कालावधीत त्यांनी ३० हून अधिक आंदोलने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.