Ashok Saraf on Baipan Bhaari Deva:  Esakal
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: “बाईपण तर भारीच पण पुरुषांचं काय…”, अशोक मामांची पुरुषांच्या मनाचा ठाव घेणारी बोलकी प्रतिक्रिया

Vaishali Patil

Ashok Saraf On Baipan Bhaari Deva: सध्या मराठी विश्वात फक्त मराठी सिनेमा बाईपण भारी देवा या चित्रपटाची चर्चा आहे. अपेक्षेपेक्षा किती तरी पटीने चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. गृहीणी असो किंवा वर्किंग वुमन किंवा सोशल मिडियावर सर्वच म्हणतायं बाईपण भारी देवा.

बाईपण किती भारी असते हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. दरम्यान या चित्रपटानंतर अशोक सराफ यांचं एक वक्तव्य सध्या खुप चर्चेत आलं

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या विशेष कार्यक्रमात जेव्हा अशोक सराफ यांना चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी पुरुषांच्या मनाचा ठाव घेणारी प्रतिक्रिया दिली.

यावेळी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणतात की, 'बाईपण का भारी आहे हे दाखवायला लोक पुढे येतील. पण, पुरुषांचं भारीपण कोणीही दाखवणार नाही. पुरुषांचं भारी पण हे नकळत ठरलं जातं आणि ते फक्त जाणवून घेण्यापर्यंतच असतं. त्याचा कधीच कुणी गवगवा करत नाही'

पुढे ते म्हणतात की, 'स्त्रिया आपल्या मनातल्या भावभावना, दु:ख मैत्रिणींसमोर किंवा नवऱ्यासमोर व्यक्त करत असतात. पण, पुरुष मंडळी यावर कायम मौन बाळगून असतात. आपली दुःख, त्रास, आर्थिक संकटं ती कधीच कोणासमोर उलगडताना दिसत नाहीत आणि त्यावर कधीच मनमोकळेपणाने बोलत नाहीत. गप्प राहून ते या त्रासाला सामोरे जातात' .

सध्या सोशल मिडियावर अशोक सराफ यांच हे वक्तव्य व्हायरल झालं आहे. अनेकांना त्याची पोस्ट शेयर करत आहे.

या चित्रपटाने रिलिज होताच अनेक रेकॉर्ड मोडले. सहा बहिणीं मिळून महिलांच्या अनेक समस्यांवर भाष्य केलं. त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबून स्वत:च्या स्वप्नांना कशा विसरतात आणि आपल्या कुटूबांसाठी सर्वस्वपणाला लावतात.

त्यात त्याचं जीवन जगणं हे कुठतरी मागेच सुटतं. त्यामुळे जबाबदारी सांभाळत असतांना आपल्या आयुष्याचाही विचार करा आणि जीवन जगा असा मोलाचा सल्ला हा चित्रपट देतो.

या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांनी याचित्रपटात खुप उत्तम अभिनय केला आहे. या चित्रपटानं जवळपास 65 कोटींच्या जवळपास गल्ला जमवला आहे आणि ही कमाई अजून सुरुच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT