Ashok Shinde Google
मनोरंजन

Marathi Actor: मराठीतील एव्हरग्रीन अभिनेते अशोक शिंदे 'नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती' पुरस्काराने सम्मानित

अशोक शिंदे यांनीआजवर २२५चित्रपट, १५० मालिका, ५० पेक्षा जास्तनाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर पाडली आहे.

प्रणाली मोरे

Ashok Shinde: मराठी सिनेनाटयसृष्टीत चिरतरुणअभिनेता म्हणून अशोक शिंदे यांची ओळख आहे.नाटक, चित्रपट, मालिकांमधून नायक, सहनायक तसेच खलनायक अशा विविधांगी भूमिका त्यांनी आजवर साकारल्या.

आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याच्या कारकिर्दीचा सन्मान करत यंदाचा ‘नटश्रेष्ठ निळू फुलेस्मृति’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. (Marathi Actor Ashok Shinde Nilu Phule Award)

सांस्कृतिक, सामाजिक आणिशैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना नटश्रेष्ठ निळूफुले आर्ट फाउंडेशनतर्फे ‘नटश्रेष्ठ निळू फुले स्मृति पुरस्कार’ देऊन गौरवण्यातयेते.यंदाचासांस्कृतिक पुरस्कार अभिनेते अशोक शिंदे यांना जाहीर झाला आहे.

अशोक शिंदे यांनीआजवर २२५चित्रपट, १५० मालिका, ५० पेक्षा जास्तनाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर पाडली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ८जानेवारी २०२३ ला शेतकरी सदन सभागृह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे संपन्न होणार आहे.

या पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना अशोकजी सांगतात, ‘नटश्रेष्ठ निळू फुले या महान कलाकाराच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. या अशा पुरस्करांमुळे काम करायला बळ मिळते. माझा होत असलेला हा सन्मान खरंच माझ्यासाठी आनंददायी आहे.

'एका पेक्षा एक', 'रंगत संगत', 'हमाल दे धमाल', 'एवढंस आभाळ', 'लालबागची राणी', 'रॉकी', 'विजय दीनानाथचौहान', 'हर हर महादेव' यासारख्या अनेक चित्रपटांमधून काम करत त्यांनी आपली लोकप्रियता जपली. मालिका विश्वातही अशोक शिंदे यांनी स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

'घरकुल', 'दामिनी', 'अवंतिका', 'स्वप्नांच्या पलीक'डे, 'दुहेरी', 'वसुधा', 'छत्रीवाली' आणिसध्या गाजत असलेली 'स्वाभिमान शोध या अस्तित्वाचा' यांसारख्या अनेक मालिकांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.

'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'प्रेम प्रेम असतं', 'अपराध मीच केला', 'षडयंत्र', ‘ब्लाइंड गेम’ अशा विविध जॉनरच्या नाटकां मध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी रसिकांना आनंद दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT