Struggler Sala: मराठीतील गूड लूकिंग अभिनेत्यांमध्ये संतोष जुवेकरचं(Santosh Juvekar) नाव हमखास घेतलं जातं. त्यानं नाटक,सिनेमा,मालिका,वेब सिरीज अशा अनेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदीतही त्यानं केलेल्या कामाची चर्चा झालीच. अनेकदा रावडी स्टाईलमधील त्यानं साकारलेल्या भूमिका विशेष पसंत केल्या गेल्या. संतोष सोशल मीडियावरही सक्रिय पहायला मिळतो. त्यानं सध्या केलेली सोशल मीडियावरची पोस्ट विशेष चर्चेत आलीय. त्यानं चक्क लिहिलं आहे,'सगळी कामं फाट्ट्यावर मारून चावट चॅनेलवर जा..' आता हे असं नेमकं संतोष का म्हणतोय याविषयी जरा सविस्तर जाणून घेऊया आपण. (Marathi actor Santosh juvekar Post Viral on social Media- Struggler Sala)
संतोष जुवेकरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओला चर्चेत आणण्यासाठी त्यानं झक्कास कॅप्शन दिलं आहे. तर त्यामुळे संतोषची चर्चा अधिक रंगली आहे. हा व्हिडीओ आहे,संतोष जुवेकर,कुशल बद्रिकेच्या प्रसिद्ध झालेल्या 'स्ट्रगलर साला' या युट्युब सिरीज संदर्भातला. विजु माने दिग्दर्शित या मराठी युट्युब सिरीजनं पहिल्याच सिझनमध्ये एक वेगळा प्रयोग असूनही तरुणाईच्या मनाला थेट जाऊन भिडण्याचा पराक्रम केला होता. याचा दुसरा सिझनही यशस्वी ठरला त्यामुळे अर्थातच चाहते मोठी आतुरतेने वाट पाहत होते याच्या तिसऱ्या सिझनची. त्याचाच पहिला भाग आज प्रसारित होणार असल्यानं संतोषनं अगदी सिरीजला शोभेल अशी भाषा व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये वापरली आहे.
संतोष जुवेकरनं व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शन लिहिलं आहे की,येतोय बरका आज संध्याकाळी ६ वाजता. 😎😎😎😎
सगळी काम फाट्ट्यावर मारून Chavat चॅनेल वर जायचं आणि #strugglersala 3 season चा पहिला episod बघायचा.
आज शनिवार संध्याकाळ फुल्ल on राडा 😊
@vijumaneofficial @badrikekushal @a_me_baba आणि संतोष sir 😜😜😜😜😜
या संतोषच्या पोस्टवर चाहत्यांनी मात्र खूप चांगल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे. आणि स्ट्रगलर साला च्या प्रमोशनल पोस्टसाठी संतोषनं वापरलेला चावट हा शब्द तर अगदी शोभून दिसतोय कॅप्शनमध्ये.
स्ट्रगलर साला ही सिरीज तरुणाईला अधिक भिडली ते त्यात अगदी चार मित्र भेटल्यावर ते काय बोलतील,कसं बोलतील हे अगदी खऱ्या आयुष्यात घडतं तसंच दाखवल्यामुळे. चावटपणा हा लोणच्यासारखं काम करतो यात,पण आता तोच सिरीजचा युएसपी होऊन बसला. यातील शिव्यांबाबत कलाकारच म्हणाले की,त्या स्क्रिप्टमध्ये नसतात. त्या ओघानं येतात. जसं चार मित्र भेटल्यावर एकमेकांची विचारपुसही प्रेमानं शिव्या देऊन करतात अगदी तसंच. पण त्यात प्रेम असतं,म्हणून ते खटकत नाही. अगदी तसंच स्ट्रगलर सालाचे संवादही तोच विचार करुन बोलले जातात. असो, संतोष जुवेकरनं हटके पद्धतीत केलेली स्ट्रगलर साला ३ची पोस्ट मात्र लय भारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.