amruta phadke special post on mother second wedding SAKAL
मनोरंजन

Amruta Phadke: "हा निर्णय घ्यायला खुप हिंमत आणि गट्स...", आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल मराठी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली

अमृता फडकेच्या आईने दुसरं लग्न केलं, त्यामुळे आईसाठी लेकीने खास पोस्ट लिहीली

Devendra Jadhav

Amruta Phadke Mother Wedding: ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता फडके हिच्या आईने नुकतंच दुसरं लग्न केलंय. अमृताने आईबद्दल खास पोस्ट लिहीली आहे.

अमृता लिहीते, "आई...., अभिनंदन ८.१२.२०२३ तुझ्या नविन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..
उत्तम लाईफ पार्टनर मिळावा, असावा, सगळ्यांचीच मनापासूनची इच्छा असते. पण तस वाटणं, तसं मिळणं आणि घडणं हे प्रत्येकाच्या नशिबी असतच असं नाही. पण आई तुला ही संधी देवाच्या कृपेने पुन्हा मिळतीये. आणि तेही तुझ्या 2nd inning च्या टप्प्यावर!"

अमृता पुढे लिहीते, "खूप वर्षांपासून बाबा म्हणून हाक मारायला आणि ती जागा घ्यायला कोणीतरी असावं अशी मनापासूनची इच्छा होती. आणि माझ्या आयुष्यात हा शब्द आणि मनात ती जागा करणं सोप्प नव्हत, पण बाबा तू खरंच ती जागा भरून काढू शकतोस ही भावनाही माझ्यासाठी खूप सुखावणारी आहे. तुझ्यामुळे मला प्रेम करायला अजून एक गोड भाऊ आणि एक सुंदर बहीण मिळालीये. मनानी खूप श्रीमंत असलेल्या खूप मोठया कुटुंबाचा मीही तुझ्यामुळे एक छोटासा भाग झालीये. खूप छान वाटतंय. मलाही खूप माणसांनी श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. त्यासाठी a big thank you."

अमृता शेवटी लिहीते, "आई, या वयात, आणि या टप्प्यावर हा निर्णय घ्यायला खूप हिम्मत आणि खूप guts लागतात. त्यासाठी खरतर दोघांनाही hats off 🫶🏻

तुमची  एकमेकांबरोबरची साथ-सोबत, तुमचा प्रेमाचा धागा अजून अजून पक्का होऊन घट्ट विणला जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना."

दरम्यान आईच्या या निर्णयात सपोर्ट केल्याबद्दल अमृताचं अनेकजण कौतुक करत आहेत. अमृताने ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अभिनय केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT