Marathi actress anvita phaltankar living in Australia is suffering, what exactly happened? SAKAL
मनोरंजन

Anvita Phaltankar: गेल्या चार महिन्यांपासून... ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मराठी अभिनेत्रीला मनस्ताप, काय घडलं नेमकं?

Devendra Jadhav

Anvita Phaltankar News: अनेक मराठी कलाकार अभिनयातून ब्रेक घेऊन काही काळ परदेशात शिक्षणासाठी जातात. काही महिन्यांपुर्वी सखी गोखलेने परदेशात शिक्षण घेतलं होतं. आता आणखी एक अभिनेत्री परदेशात शिक्षण घेत आहे. ती म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला फेम अभिनेत्री अन्विता फलटणकर.

अन्विता सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठात शिक्षण घेत आहे. अन्विताला मात्र ऑस्ट्रेलियातील वास्तव्यास मनस्ताप सहन करावा लागत आहे. अन्विताने सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिला आलेला अनुभव सहन करावा लागलाय.

अन्विता ऑस्ट्रेलियात ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे तिथे तिला गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अन्विता सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहीते, "हिटर - एअरकॉन डिव्हाईस बिघडल्याने आम्हाला गेल्या अनेक दिवसांपासुन त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्याबद्दल तुम्हाला गेल्या चार महिन्यांपासुन ईमेल लिहित आहे.

अन्विता शेवटी लिहीते, "इतका त्रास होऊनही आम्ही दर महिन्याला भाडे भरतो. यावर ना उपाय ना आम्हाला आर्थिक भरपाई दिली आहे. संपूर्ण परिस्थितीचा आमच्या राहणीमानावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. जगभर लोकप्रिय असलेल्या अशा संस्थेकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी जे सेमिस्टरसाठी ऑस्ट्रेलियाला येत असतील त्यांनी कृपया UniLodge ला निवडू नका. कारण ते तुमचा महत्वाचा वेळ वाया घालवतील."

अन्विताच्या या पोस्टवर अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. याशिवाय झालेल्या त्रासाबद्दल आवाज उठवल्याबद्दल तिचं कौतुकही केलंय.

अन्विताला आपण येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत, याशिवाय गर्ल्ज या मराठी सिनेमाक पाहिलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT