marathi director pravin karale passed away
marathi director pravin karale passed away  SAKAL
मनोरंजन

Pravin Raja Karale Death: 'हृदयात समथिंग समथिंग’ फेम चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे निधन

Devendra Jadhav

Pravin Raja Karale Death: गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वातले अनेक तारे निखळले आहेत. सुलोचना दीदी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं.

याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री आशा तांबे काळाच्या पडद्याआड गेल्या. आता मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक तारा निखळला आहे.

तो म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे. प्रवीण यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीत शोक व्यक्त केला जातोय.

(marathi director pravin karale passed away )

चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे आज (२३ जून) सकाळी दहा वाजता पुण्यात मंगेशकर इस्पितळात दुःखद निधन झाले.

प्रवीण कारळे हे सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे चिरंजीव होते.

वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. अगदी लहानपणापासूनच त्यांनी चित्रपटसृष्टीतील बारकावे समजून घेतले होते.

त्यांचे ‘बोकड’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘मानसन्मान’, ‘माझी आशिकी’, ‘हृदयात समथिंग समथिंग’ हे चित्रपट गाजले होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Wealth : पंकजा मुंडेंचा व्यवसाय शेती, नावावर एकही गाडी नाही; किती कर्ज अन् किती संपत्ती? वाचा डिटेल्स

Team India Return: वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचं मायदेशात येण्याचं शेड्युल पुन्हा बदललं, जाणून घ्या खेळाडू कधी परतणार?

Pune Accidents: 3 महिन्यांत 27 मृत्यू! लोणावळ्यातील ही ठिकाणे ठरली जीवघेणी, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Weather Update: महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये 6 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Meta Controversy : मेटाकडून वापरकर्त्यांची फसवणूक! इंस्टाग्राम अन् फेसबुकबद्दलचे नवे मॉडेल फसले; कंपनीला भरावा लागणार दंड?

SCROLL FOR NEXT