चित्रपट विश्वातील प्रसिद्ध नाव म्हणजे विक्रम गोखले. ते सध्या त्यांच्या धक्कादायक वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांच्यावर टीकाही करण्यात आली आहे. त्यांनी राजकीय, सामाजिक, परिस्थितीवरही त्यांनी कडाडून टीका केली आहे. आपल्या वेगळ्या प्रकारच्या भूमिकेसाठी विक्रम गोखले यांच्याकडे पाहिले जाते. सडेतोड मतं व्यक्त करणं ही देखील त्यांची ओळख आहे.
कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे. त्यापूर्वी कोणी नव्हते का?
या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाही, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना शंभराच्या खाली मी गुण देतो. लाल बहादूर शास्त्री सोडून पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबरला येते. ती हेतुपरस्पर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. जे 70 वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी मोदी चांगलं काम करतात. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन. ज्या कारणानं बाळासाहेब यांनी शिवसेना स्थापन केली. त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. हे गणित चुकलेलं आहे हे सुधारायचा असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही.
मी एस टी महामंडळाचा मी ब्रँड अँम्बेसिडर होतो. एअर इंडिया आणि एस टीला गाळात घालण्याचे काम राजकीय लोकांनी केला.
कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवलं नाही, हे चुकीचे आहे. ज्यांना फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजप आघाडीबाबत पुढाकार घ्यायला हवा.
शाहरुख आणि आर्यन माझं काहीही वाकडं करु शकणार नाही. देशाच्या बॉर्डर वर 21 वर्षाचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो आर्यन हिरो नाही. मतपेट्यांचं राजकारण करणारे यांच्यामुळे हिंदू मुस्लिम, ब्राह्मण दलित यांत वाद होतील. शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आले पाहिजे. याबाबत मी पुढाकार घेतलाय आणि घेईन. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलंय. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.