Dharmaveer2 announcement, Mangesh Desai producer Instagram
मनोरंजन

Dharmaveer 2: आनंद दिघेंच्या खळबळजनक मृत्यूचं रहस्य उलगडणार ? 'धर्मवीर 2' ची घोषणा

'धर्मवीर 2' ची घोषणा करताना निर्माता मंगेश देसाईनं नव्या कथानकाविषयी देखील मोठा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Dharmaveer 2: धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनचरित्रावर आधारित धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे ह्या बहुचर्चित चित्रपटाचा नुकताच वर्षपूर्ती कार्यक्रम संपन्न झाला. २७ डिसेंबर २०२१ रोजी कोलशेत येथे धर्मवीरच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती, त्या दरम्यान तिथे उभारण्यात आलेल्या जुन्या आनंदआश्रम प्रतिकृतीच्या सेटवर हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. "धर्मवीरांच्या गोष्टी खूप बाकी आहेत, अनेक भाग करून ही त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग २०२४ ला घेऊन येत आहोत" अशी अधिकृत घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी मुख्य कलाकार प्रसाद ओक याच्यासमवेत केली. धर्मवीर एका भागात संपणारा विषय नसून तो एक खंड आहे. (Dharmaveer2 announcement, Mangesh Desai producer)

पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल!

मात्र, यावर मंगेश देसाई यांनी असे सांगितले की, ' धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अनेक पैलू अद्याप गुलद्त्यातच आहेत, जे लोकांपर्यत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागात त्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत".

शिवाय, या निमित्ताने आनंद दिघे नामक ज्वलंत व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर साकारणारा अभिनेता प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येईल. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे असून, पहिल्या भागातील कलाकारांची तगडी फौज दुसऱ्या भागात देखील आपापल्या व्यक्तिरेखेला न्याय देताना दिसून येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT