marathi movie hambirrao fame actor sunil palwal comment on marathi film industry in sakal exclusive interview sakal
मनोरंजन

'हंबीरराव' मधील 'या' अमराठी अभिनेत्याचं मोठं विधान.. म्हणाला,मराठीत सगळेच..

'हंबीरराव' चित्रपटात 'बहादूर खान' साकराणाऱ्या अमराठी अभिनेत्याने मराठी चित्रपट सृष्टीचे काही अनुभव सांगितले आहेत.

नीलेश अडसूळ

hambirrao marathi movie : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याचे पहिले सरसेनापती होते शूर-पराक्रमी हंबीरराव मोहिते! पराक्रम हंबीररावांच्या रक्तातच होता आणि ते प्रामाणिक आणि निष्ठावान होते. त्याच पराक्रमी हंबीररावांची शौर्यगाथा म्हणजेच ‘सरसेनापती हंबीरराव’ हा प्रवीण तरडे (pravin tarde) दिग्दर्शित मराठी चित्रपट. २७ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. बॉक्स ऑफीस वरही चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटात एक भूमिका लक्षणीय ठरली ती म्हणजे 'बहादूर खान.' (sunil palwal asa bahadur khan in hambirrao) ही भूमिका हिंदीतील 'सुनील पलवल' (sunil palwal) या अमराठी अभिनेत्याने साकारली होती. या अभिनेत्या मराठी चित्रपट सृष्टी बाबत मोठे विधान केले आहे. सकाळ ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. (marathi movie hambirrao fame actor sunil palwal comment on marathi film industry in sakal exclusive interview)

सुनील म्हणतो, 'हंबीरराव'मध्ये दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सहाय्यक तुषार यांनी मला चित्रपटात काम करणार का हे विचारले. त्यांनी माझी प्रोफाइल पाहिली होती. शिवाय प्रवीण तरडे यांनाही माझ्याविषयी माहिती दिली. त्यांनी मला विचारणा करताच लगेच मी होकार दिला आणि मग मला सेट वर बोलवण्यात आलं. सेटवर मला प्रवीण तरडे भेटले, तेव्हा ते जे काही बोलले हे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. ते मला भेटल्यावर म्हणाले, 'होय, मी तुला ओळखतो. जॉली एलएलबी' चित्रपटातील तुझ काम मला खूप आवडलं होतं. तेव्हाच मी ठरवलं होतं एक दिवस तुला माझ्या फिल्ममध्ये घेईन.' हे ऐकून मी भारावून गेलो.

पुढे त्याने अत्यंत महत्वाचं विधान केलं. तो म्हणाला, 'मराठी चित्रपट सृष्टीत काम करणं हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. इथे सेटवर सगळेच एकमेकांना ओळखत असतात, घरच्या सारखे वागतात, हे मला खूपच भावलं. इथे कसलाही भेदभाव नाही, कुणी मोठा नाही, कुणी लहान नाही, सगळे एकमेकांमध्ये मिसळून काम करतात. अगदी मोठा स्टार असला तरी तोही आपल्या सहकाऱ्यासोबत आपुलकीने वागतो. प्रवीण सर, पिट्यादादा ते अगदी गश्मीर महाजनी यांच्यापासून सर्वांनी मला घरचा सदस्य मानलं. मजा, मस्ती करत चित्रीकरण कधी पूर्ण झालं कळलं ही नाही. असं चित्र कुठं पाहायला मिळतं. इथून पुढेही मला मराठीत काम करायला नक्कीच आवडेल,' अशा शब्दात त्याने मराठी चित्रपट सृष्टीचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT