Pushkar Jog producer actor of Marathi Movie Victoria,Exclusively speak on Marathi Movies struggle for screen Instagram
मनोरंजन

Podcast:'परिस्थितीपुढे हात टेकले..'; मराठी सिनेमाचं पुष्करनं सांगितलेलं भीषण वास्तव आपल्याला हलवून सोडेल

'व्हिक्टोरिया' सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यामागे नेमकं कारण काय हे सांगताना मराठी सिनेइंडस्ट्री विषयी अनेक खुलासे पुष्कर जोगनं सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत केले आहेत.

प्रणाली मोरे

Pushkar Jog: १६ डिसेंबरला मराठीतील बहुचर्चित हॉरर-थ्रिलर जॉनर असलेला 'व्हिक्टोरिया' बडा सिनेमा रिलीज होणार होता. पण त्याचवेळेला नेमका हॉलीवूडचा 'अवतार २' रिलीज झाल्यानं व्हिक्टोरियाच्या निर्मात्यांनी आपल्या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं. 'व्हिक्टोरिया' सिनेमात पुष्कर जोग,सोनाली कुलकर्णी,आशय कुलकर्णाी मुख्य भूमिकेत आहेत.

आता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलल्यानं पुन्हा एकदा आपल्याच राज्यात मराठीची गळचेपी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सिनेमात केवळ अभिनेता म्हणून नाही तर निर्मात्याची मोठी भूमिका पार पाडणाऱ्या पुष्कर जोगनं याचा आपल्याला मोठा आर्थिक फटका बसल्याचं सांगत मराठी इंडस्ट्रीचं भीषण वास्तवही सकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीतून मांडलं आहे.(Pushkar Jog producer actor of Marathi Movie Victoria,Exclusively speak on Marathi Movies struggle for screen)

पुष्करनं या पॉडकास्ट मुलाखतीत आजही थिएटरमध्ये मराठी सिनेमांसाठी स्क्रीन मिळवताना कसं झगडावं लागतं याविषयी देखील मोठा खुलासा केला आहे. बॉलीवूड,हॉलीवूडच्या तुलनेत मराठी सिनेमांना मिळणाऱ्या स्क्रीनविषयी पुष्कर जे बोललाय त्यानं आपण प्रेक्षकही म्हणूनही शॉक होऊ हे नक्की. ही पॉडकास्ट मुलाखत ऐकाल तर मराठी सिनेमाचं भीषण वास्तव आपल्याला हलवून सोडेल हे नक्की.

पुष्करनं या मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीत कसे वेगवेगळ्या विचारांचे गट आहेत, इथे एकी नाही आणि म्हणून मराठी इंडस्ट्रीला आजही अनेक कारणांसाठी झगडावं लागत आहे यावर पुष्करनं सांगितलेलं सत्य कुठेतरी एक प्रेक्षक म्हणून आपल्यालाही याचा विचार करायला भाग पाडतं. मराठी इंडस्ट्रीच्या अशा अनेक न माहित असलेल्या गोष्टी पुष्करनं थेट बोलून दाखवल्या आहेत. तेव्हा सकाळ पॉडकास्टला पुष्कर जोगनं दिलेली ही मुलाखत नक्की ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT