मनोरंजन

Movie Review; एकदा थोडी घेतली तर बिघडलं कुठं?, सात बायकांचा 'झिम्मा'

मराठी चित्रपटांना हाऊस फुल्ल गर्दी झालीय, थिएटरमध्ये प्रेक्षकांना बसायला जागा नाही. असं चित्र गेल्या काही वर्षात मोजक्याच चित्रपटांनी प्रेक्षकांना दाखवलं.

युगंधर ताजणे

मराठी चित्रपटांना हाऊस फुल्ल गर्दी झालीय, थिएटरमध्ये प्रेक्षकांना बसायला जागा नाही. असं चित्र गेल्या काही वर्षात मोजक्याच चित्रपटांनी प्रेक्षकांना दाखवलं. दोन वर्षांपासून कोरोनानं तर मनोरंजन क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठी चित्रपटांसाठी ओटीटी हाच एक ऑप्शन होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये मराठी मनोरंजन विश्वामध्ये शांतताच होती. फार थोड़्याच मराठी वेबसीरिज आणि चित्रपट प्रदर्शित झाले आहे. आणि त्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. आता हे सगळं सांगण्यामागे कारण म्हणजे 'झिम्मा'. या चित्रपटानं दोन ते तीन आठवड्यांपासून प्रेक्षकांना थेएटरमध्ये खेचून आणलं आहे.

केल्यानं देशाटन....असं पूर्वीपासून आपल्याकडे म्हटलं जात असे. अजूनही त्यावर वेगवेगळ्या प्रकारे विचारमंथन होत असतं. तुम्हाला खूप काही जाणून घ्यायची इच्छा असेल तर भरपूर वाचा किंवा भरपूर फिरा....यापैकी अनेकजण दुसऱ्या पर्यायाला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. झिम्मा अशा सात स्त्री व्यक्तिरेखांची कहाणी मांडण्यात आली ज्यातून त्यांच्या गतकाळातील वेगवेगळ्या आठवणींचा प्रवास मांडण्यात आला आहे. लंडनच्या अलिशान इमारतींच्या हिरवळीवर बसल्यानंतरही आपल्या घरी यावेळी काय चाललं असेल, आपल्याला अशाप्रकारे झोपलेलं पाहून कोण काय म्हणेल, असे एक दोन नव्हे तर नाना प्रश्न त्यांना पडले आहेत. त्याची उत्तरं जाणून घेण्यासाठी झिम्माच्या वाटयाला जावं लागेल.

झिम्मा एक हलका फुलका तितकाच गंभीर चित्रपट आहे. वरकरणी तो आपल्याला खळखळून हसवत असला तरी अचानक कमालीचा अस्वस्थही करतो. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या दिग्दर्शनाला प्रेक्षकांची आता मोठ्या प्रमाणावर दाद मिळताना दिसत आहे. लंडनमध्ये त्यांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रीयन बाज उभा केलाय त्याचं प्रेक्षकांनी कौतूक केलं आहे. यामध्ये एक गुजराती महिलाही आहे. वेगवेगळ्या वातावरणातून, कुटूंबातून आलेल्या त्या सात जणींना लंडनला फिरायला जायचं आहे. त्या प्रत्येकीची एक वेगळी स्टोरी आहे. वेदना आहे, संघर्ष आहे. तो समजावून सांगण्यासाठी दिग्दर्शकानं विनोदाचा प्रभावीपणे वापर केला आहे.

सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुहास जोशी, मृण्यमी गोडबोले आणि सुचेता बांदेकर यांनी कमाल केली आहे. या प्रत्येकीचा अभिनय सुरेख आहे. मात्र तरीही यासगळ्यांमध्ये निर्मिती सावंत यांनी केलेल्या अभिनयाची प्रेक्षकांच्या मनावर पडणारी छाप इतर जणींच्या तुलनेत अधिक आहे. त्यांचं विनोदाचं टायमिंग, हावभाव आणि संवाद आहे. झिम्मा मधील आणखी एक खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे संवाद बोलके आहेत. ते लक्षात राहणारे आहेत. बराच काळ मनात रेंगाळणारे आहे. लंडनमध्ये या सात जणी जेव्हा एका हॉटेलमध्ये उतरतात आणि तिथे रात्री त्यांच्या 'बसण्याचा' जो कार्यक्रम पार पडतो. तो प्रसंग धमाल आहे. त्यानंतर पुन्हा एक दोनवेळा त्याची पुनरावृत्ती होते. मात्र प्रेक्षक त्याला मनपूर्वक दाद देतो.

यासगळ्यात अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं देखील सुंदर अभिनय केला आहे. त्याची स्वतची ट्रॅव्हल कंपनी आहे. आणि त्याच्याच कंपनीच्या मार्फत या सातजणी लंडनवारीला जातात. सायली संजीवनंही लक्षवेधून घेणारी भूमिका साकारली आहे. ती आणि तिचा तो परदेशी मित्र यांनी धमाल करत प्रेक्षकांना मनमुराद हसवलं आहे. त्या प्रत्येकीचा भुतकाळ आहे. त्यांना वर्तमानात सतावणाऱ्या काही कौटूंबिक अडचणीही आहेत. काही जणी वैयक्तिक कारणास्तव त्रस्त आहेत. मात्र आपलं घर सोडल्यानंतर काळजी तिथचं सोडून आहे सध्या समोर आहे त्याचा आनंद घेण्याचा संदेश दिग्दर्शकानं झिम्मातून दिला आहे.

बाईमाणूस दारुच्या वाट्याला जात नाही. तिनं दारुला हात लावला तर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतोच. झिम्मामध्ये तो दृष्टिकोन बदलण्यासाठी सात जणींचं बसणं प्रेक्षकांच्या मनावर वेगळं परिणाम करतं. दिग्दर्शकाला त्यातून एक वेगळा संदेश प्रेक्षकापर्यत पोहचवायचा आहे. त्यात तो यशस्वीही झाला आहे. म्हणून तर त्या सात जणींमधील एक जण म्हणतेच.... आपण थोडी रोज पितो...कधीतरी पिलो तर कुठं बिघडलं...तिच्या त्या संवादानं प्रेक्षक काही काळ गंभीर झालेला दिसतो...हेही झिम्माचं यश म्हणावं लागेल.

रेटिंग - ***1/2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT