'बिग बॉस' म्हटंल की भल्याभल्या शोच्या टीआरपी खाणारा शो. बिग बॉस सुरु होताच कितीही हिट मालिका असो तिची टीआरपी घटतेच... असं काहिस चित्र दर वर्षी आपल्याला पहायला मिळायचं, मात्र यंदा हे चित्र काहिस बदलंय... मराठी मालिकांन समोर बिग बॉसची जादू फिकी पडलेली दिसतेय. 'बिग बॉस मराठी ४' टॉप १० मध्येही स्थान मिळवु शकलेला नाही. त्यामुळे बिग बॉसचा मराठी सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास अयशस्वी ठरला आहे तर दीपा आणि अरुंधतीने टीआरपीच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
'रंग माझा वेगळा' या मालिकेने पुन्हा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकांवर ‘फुलाला सुगंध मातीचा' हि मालिका आहे. 'आई कुठे काय करते' पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.चौथ्या क्रमांकावर 'तुझेच मी गीत गात आहे ' हि मालिका आपले स्थान मिळवण्यास यशस्वी झाली आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गौरी आणि जयदीप प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अशस्वी झाले आहेत. अरुंधती आणि आशुतोषचं लग्न आणि अनिरुद्ध व संजनाचा घटस्फोट यांमुळे 'आई कुठे काय करते’ या मालिकेतच्या टीआरपीत कमालीची वाढ झाली आहे.
'बिग बॉस मराठी ४' च्या ग्रॅण्ड प्रीमिअर वेळी शोची टीआरपी फक्त ४. १ एवढाच होता. पहिल्या आठवड्यात टीआरपी ३ वर पोहचला. नेहमीच बिग बॉस सुरु झाल्यानतंर त्यांला प्रेक्षकांचा तगडा प्रतिसाद मिळतो मात्र आता टीआरपीत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शोचे निर्माते आणि महेश मांजरेकर शोमध्ये काही बदल करतात का? कशा प्रकारे ते पुन्हा टीआरपीच्या यादीत आपलं नावं मिळवतात ? हे जाणुन घेणे उत्सुकतेचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.