marathi serial trp rating latest update jui gadkari tharla tar mag serial first rank in trp race sakal
मनोरंजन

Marathi Serial: आईसोबत दीपालाही केलं धोबीपछाड.. TRP वर फक्त जुई गडकरीची हवा..

पहिल्या दहा क्रमांकावर आहेत 'या' मराठी मालिका आहेत..

नीलेश अडसूळ

Marathi Serial TRP update: ओटीटीचे प्रस्थ कितीही वाढले तरी मालिकांची जादू काही कमी झालेली नाही. आजही चांदया पासून बांदयापर्यंत घराघरात मालिका पाहत जातात. सध्या मराठीमध्ये पाच वाहिन्या आणि पंचवीस हून अधिक मालिका असल्याने कोणती मालिका 'टीआरपी'च्या रेस मध्ये सर्वात वर आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.

गेली काही महीने 'स्टार प्रवाह' वाहिनी यामध्ये सर्वात पुढे आहे तर गेली काही दिवस याच वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' आणि 'आई कुठे काय करते' या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बराच ववेळ बाजी मारली. पण गेले काही आठवडे चित्र पूर्ण बदलले आहे. अभिनेत्री जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ही मालिका सलग पाचव्या आठवड्यात सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका ठरली आहे.

(marathi serial trp rating latest update jui gadkari tharla tar mag serial first rank in trp race)

स्टार प्रवाह वरील जुई गडकरी हिच्या 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेला सर्वाधिक टीआरपी म्हणजेच 6.8 रेटिंग मिळालं आहे. तर 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका दुसऱ्या स्थानावर असून या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. तर  'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका 6.5 रेटिंग सह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विशेष म्हणजे गेली काही महीने आघाडीवर असलेली 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका मागे पडलेली असून चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे. 

तर 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडली आहे. या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे. त्या पाठोपाठ 'ठिपक्यांची रांगोळी', 'सहकुटुंब सहपरिवार', 'स्वाभिमान' , 'अबोली',  'लग्नाची बेडी' या मालिका पहिल्या दहा क्रमांकावर आहेत.

विशेष म्हणजे पहिल्या दहा स्थानावर स्टार प्रवाह वाहिनीच्याच मालिका असल्याने ही वाहिनी यंदाही सर्वाधिक टीआरपी मिळवणारी वाहिनी ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT