Bigg Boss Marathi 4 Rakhi Sawant Esakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: "बापावर जाऊ नकोस....", राखी आरोहला मारायला धावली...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस मराठी आता दिवसेंदिवस रंगात येत आहे. घरामध्ये टास्क दरम्यान टास्कवरून होणारी भांडणं, मारामारी, शाब्दिक चकमक, आरोप - प्रत्यारोप हे होत आहे आन् त्यातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. घरातील सदस्याचे वाद तर आपण पाहिलेचं होते मात्र आता त्यातच ड्रामा क्विन राखी सांवतची एंट्री झाल्यावर तर या शोमध्ये दररोज ती चर्चेत आहे. त्यातच आता राखी सावंत आणि आरोह वेलनेकर याच्यामध्ये जोरदार भांडण झालयं.

बिग बॉसने आज शाई फेक नॉमिनेशन टास्क खेळले. या टास्क मध्ये दोन सदस्य एकमेकांच्या चुका सांगत होते. त्यात आरोह राखी बदल तक्रार सांगत बोलतो की " राखी सारखी कुरघोडी करते , गळ्यात लिंबू मिरची बांधते आणि सारखी चर्चेत राहण्यासाठी काही ना काही करत असते", तेव्हा राखी बोलते, "मी तुझ्या सारख झोपा तर नाही काढत ,तेव्हा आरोह बोलतो तुझ्या बापाचं काय जातंय"

बापाच नाव काढताच राखीची तळपायाची आग मस्तकात जाते. ती जोरात आणि रागात त्याला बोलते, "बापावर जाऊन नको". इतकच नाही तर ती आरोह वर धाऊन जाते राखी इतकी भडकलेली दिसते की घरातील इतर सदस्य तिला अडवण्याचा प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

बिग बॉसच्या घरात मागील आठवड्यात चार नवीन वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. विकास निकम, मीरा जगन्नाथ, राखी सावंत आणि आरोह वेलनेकर हे चार नवीन सदस्य आले होते. आणि या चार सदस्यांनी आठवडाभर आपली बॉसगिरी केली. त्यातच विकास निकम यांनी मीरा जगन्नाथ हे दोन सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर गेले तर राखी सावंत आणि आरोह वेलनेकर शेवट पर्यंत बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी प्रयत्न करतांना दिसताय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT