Vikas Patil and Swati Patil Sakal
मनोरंजन

लग्नाची गोष्ट : जोडी ‘अ‍शी हव्वी’!

मराठी मनोरंजन सृष्टीतील एक गुणी अभिनेता अशी ओळख असलेला आणि गेली अनेक वर्षं वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केलेला अभिनेता म्हणजे विकास पाटील.

विकास पाटील

मराठी मनोरंजन सृष्टीतील एक गुणी अभिनेता अशी ओळख असलेला आणि गेली अनेक वर्षं वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केलेला अभिनेता म्हणजे विकास पाटील. तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहत आपल्या माणसांचं कौतुक करत असतो. अशीच त्याच्या जवळची एक व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी स्वाती पाटील. स्वाती आणि विकास यांच्या लग्नाला आता १२ वर्षं झाली आहेत. काही वर्षांपूर्वी स्वातीही अभिनय क्षेत्रात काम करत होती, पण काही काळानं स्वातीनं हे क्षेत्र सोडलं आणि ती नोकरी करू लागली. एका चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली. यादरम्यान त्यांची छान ओळख झाली आणि त्यांच्यात असलेलं मैत्रीचं नातं फुलत गेलं. सलग ४ वर्षं एकमेकांना डेट केल्यावर २००८मध्ये दोघं बोहल्यावर चढले.

विकासच्या मते ‘बायको अशी हव्वी’ या वाक्याला साजेशी स्वाती आहे. विकासनं स्वातीबद्दल बोलताना सांगितलं, ‘‘स्वाती अत्यंत गोड स्वभावाची मुलगी आहे. ती खूप लाजाळू आहे, मितभाषी आहे. तिला तिचं घर, कुटुंब यामध्येच रमायला फार आवडतं. तिच्याबद्दलची एक विशेष गोष्ट म्हणजे, ती कोणत्याही सोशल मीडिया साइटवर नाही. तिथं इतरांच्या फोटोंना लाईक्स देणं, चॅटिंग करणं यापेक्षा समोरच्या व्यक्तीला फोन करून, त्यांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारणं ती जास्त पसंत करते. ती माझी सपोर्ट सिस्टीम आहे. आतापर्यंत मी घेतलेल्या लहान-मोठ्या सगळ्याच निर्णयात तिनं मला प्रत्येक वेळी पाठिंबा दिला आहे. तिच्या माझ्या आयुष्यात येण्यानं माझ्यात एक सकारात्मक बदल घडून आला. तिच्यामुळं मला माझं करिअर, आयुष्य याकडं बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. ती खूप समजूतदार आहे. आमचं लग्न झालं त्यानंतर कामानिमित्त मी मुंबईत असायचो आणि ती माझ्या आई बाबांबरोबर पुण्यात. त्यावेळीही तिनं तिचं काम, कुटुंबाचा उत्तम समतोल साधला. तिनं तिच्या स्वभावानं सगळ्यांना बांधून ठेवलं होतं आणि आजही ते चित्र बदललेलं नाही...’’

स्वातीनंही विकासचं भरभरून कौतुक केलं. ती म्हणाली, ‘‘विकास हा खूप शांत मुलगा आहे. सगळ्यांची तो तितक्याच आत्मीयतेनं काळजी घेतो, प्रत्येकाला जीव लावतो. तो खूप समजूतदार आहे. तो माझा नवरा आणि मित्रही आहे. लग्नानंतरच्या आतापर्यंतच्या आमच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले. वेळोवेळी त्यानं मला त्यातून मार्ग काढण्यासाठी सपोर्ट केला आहे. विकासचा स्वभाव शांत आणि संयमी असल्यानं तो कोणत्याही परिस्थितीतून चांगला मार्ग काढतो. तो खूप मॅच्युअर आहे. त्याच्यातला हा गुण मला आत्मसात करायला फार आवडेल.’’

स्वाती आणि विकास या दोघांनाही वाचन करणं, फिरायला जाणं आणि व्यायाम करणं या गोष्टींची खूप आवड आहे. विकासनं आतापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका स्वातीला आवडल्या आहेत. परंतु आता ‘बायको अशी हव्वी’ या कलर्स मराठीवरील मालिकेत विकास साकारत असलेली विभास राजेशिर्के ही भूमिका स्वातीला फार आवडते. याचं कारण म्हणजे, खऱ्या आयुष्यात विकास भूमिकेपेक्षा पूर्ण वेगळा आहे. यानिमित्तानं विकासला ग्रे शेडच्या रोलमध्ये पाहायला मिळत असल्यानं स्वाती विकासला या भूमिकेत बघणं खूप एन्जॉय करतेय. स्वातीप्रामाणंच ही भूमिका विकासच्याही मनाच्या जवळची आहे. तो म्हणाला, ‘‘मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिका साकारल्या आदर्श मुलाच्या होत्या, पण ‘बायको अशी हव्वी’मधील विभासमुळं मला ग्रे शेडची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. विभासची स्त्रियांबद्दलची मतं खूप जुन्या विचारसरणीची आहेत. त्याला एखादी गोष्ट मिळवायची असल्यास तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक आहे, कारण मी खऱ्या आयुष्यात याच्या अगदी उलट आहे.’’

(शब्दांकन - राजसी वैद्य)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT